शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावर होणार अपंगांचे स्वतंत्र कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 13:19 IST

जिल्हास्तरावर अपंगांचे स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नरत आहे. या कार्यालयासाठी ३७२ पदांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभागाचे काम होणार कमी ३७२ पदांना सामान्य प्रशासन विभागाकडून मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने अपंगांचे ७ प्रवर्गावरून २१ प्रवर्ग केले आहे. त्यामुळे अपंगांची लोकसंख्या वाढणार आहे. अपंगांच्या सर्व योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येतात. जि.प.मध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने अपंगांना न्याय मिळत नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर अपंगांचे स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नरत आहे. या कार्यालयासाठी ३७२ पदांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला आहे.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अपंगांच्या योजना राबविण्यात येतात. या कार्यालयात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता व सहा. सल्लागार अशी दोन पदे आहेत, ज्यांच्याकडे दिव्यांगांशी संदर्भात सर्व योजना, दिव्यांग शाळेचे अनुदान, वेतन, शिष्यवृत्ती आदी कामांचा भार असतो. केंद्र सरकारने ७ प्रवर्गावरून २१ प्रवर्ग केले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात २९ लाख दिव्यांगांची संख्या आहे. इतर १४ प्रवर्ग समाविष्ट केल्याने दिव्यांगांची लोकसंख्या ७० लाखाच्या जवळपास जाणार आहे. त्यामुळे जि.प. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय देणे शक्य होणार नाही.शिवाय दिव्यांगांच्या प्रमाणपत्रापासून विविध बाबी आहेत, ज्या त्यांना वेगवेगळ्या कार्यालयातून घ्यावा लागतात. या सर्व बाबी लक्षात घेता, सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कार्यालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या सामाजिक न्याय भवनात हे कार्यालय राहणार आहे. प्रत्येक कार्यालयात पाच क र्मचारी राहणार आहे.सध्या दिव्यांगांच्या विशेष शाळेत लिपिकवर्गीय व चतुर्थश्रेणीचे ४०० कर्मचारी अतिरिक्त आहेत. यांचा समावेश या कार्यालयात करण्याचा विभागाचा मानस आहे. शिवाय समाजकल्याण विभागात कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता व सहायक सल्लागार या दोन पदांना पदोन्नती देऊन त्यांना जिल्हा अपंग विकास अधिकारी गट ब दर्जा देण्यात येणार आहे. या कार्यालयाचा कुठलाही अतिरिक्त भुर्दंड शासनावर बसणार नाही. यासंदर्भात अपंग संघटनांकडून मागणीसुद्धा होती.

कार्यालयाचे कार्ययोजनांचा लाभ तत्काळ दिव्यांगांपर्यंत पोहचविणेप्रत्येक विभागाला ५ टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करायचा आहे, त्यावर नियंत्रण ठेवणेनवीन योजना तयार करून, ५ टक्के निधीतून राबविणेविशेष शाळांवर नियंत्रण, अनुदान व वेतनाची तरतूद करणे

शासनाने दिव्यांगांच्या कल्याणार्थ नुकतेच धोरण जाहीर केले आहे. धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना शासन निर्णय करणे गरजेचे आहे. त्याकरिता विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित करण्याचा निर्णय घेऊन तो तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.राजकुमार बडोले,सामाजिक न्यायमंत्री

टॅग्स :zpजिल्हा परिषद