शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांशी निपटण्यासाठी लवकरच स्वतंत्र यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:32 IST

सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोलून दाखवला असून यासंदर्भात लवकरच आदेश जारी केला जाणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट देणार आदेश : सरकारच्या उदासीन कारभारावर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोलून दाखवला असून यासंदर्भात लवकरच आदेश जारी केला जाणार आहे.सार्वजनिक निधीत घोटाळे करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी राज्य सरकार तातडीने पावले उचलत नसल्याची बाब न्यायालयाला खटकली आहे. एक -दोन नाही तर, अनेक प्रकरणांमध्ये असे झाल्याचे न्यायालयाला आढळून आले आहे. घोटाळेबाजांवर सरकार वेळीच योग्य कारवाई करीत नाही. बरेचदा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. तेव्हापर्यंत महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊन जातात. घोटाळ्यांमुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. घोटाळ्याच्या चौकशीमध्ये सरकारची ऊर्जा व्यर्थ जाते. प्रकरण न्यायालयात आल्यास न्यायव्यवस्थेचा किमती वेळ खर्ची होतो. शेवटी हातात ठोस म्हणावे असे काहीच लागत नाही. ही बाब लक्षात घेता जनहिताकरिता सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची गरज दिसून येत आहे असे विचार न्यायालयाने व्यक्त केले आहेत. तसेच, यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यासाठी संबंधित प्रकरणावर २५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.त्या प्रकरणात सहा वर्षानंतर कारवाईयवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, राळेगाव व केळापूर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गतच्या कामांत झालेल्या आर्थिक घोटाळ्यामध्ये सहा वर्षांनंतर कारवाई सुरू करण्यात आली. ही कामे मार्च-२०१२ पूर्वीची असून सुरुवातीच्या तक्रारीनंतर घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी २०१३ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.न्यायालयाने दणका दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले व सध्या उपलब्ध असलेल्या अपूर्ण रेकॉर्डवरून आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले व विभागीय चौकशीकरिता दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले. सरकारी उदासीनतेचा असाच प्रकार इतर अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाला पहायला मिळाला आहे. त्यामुळे न्यायालयाने घोटाळे थांबविण्यासाठी व आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी हा विषय व्यापकतेने हाताळण्याचा निश्चय केला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश धात्रक कामकाज पहात आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी