शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 10:15 IST

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त सहारियालोकमतशी विशेष बातचित

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होेते. त्यावेळी लोकमतने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी विशेषत्वाने टाळले. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे कठोर पालन आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन केले जाते. आचारसंहिता उल्लंघन झाल्याचा प्रकार उघडकीस येताच कारवाई केली जाते. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली. किती लोकांना दंड ठोठावला, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केले.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदान कार्ड किंवा मतदानाबाबाा त्यांनी सांगितले की, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभियान राबवित आहे. कुठल्याही प्रकारची माहिती उघडकीस येताच तात्काळ कारवाई केली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बोगस मतदार ओळख पत्र बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक