शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आयुक्तांनी आदेश मागे न घेतल्यास बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 20:53 IST

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील विविध व्यापारी संघटनांनी १९ ऑगस्टला बंद पुकारून एकजुटतेचे प्रदर्शन केले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात व्यापारी संघटना एकत्रित आल्या आणि आयुक्तांना आदेश मागे घेण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देव्यापारी संघटनांचा इशारा : व्यापाऱ्यांवरील जाचक अटी रद्द कराव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील विविध व्यापारी संघटनांनी १९ ऑगस्टला बंद पुकारून एकजुटतेचे प्रदर्शन केले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात व्यापारी संघटना एकत्रित आल्या आणि आयुक्तांना आदेश मागे घेण्याचे आवाहन केले. एक दिवसाच्या बंद आंदोलनानंतर आयुक्त आदेश मागे घेत नसतील तर पुढे व्यापारी दुकाने बेमुदत बंद ठेवतील, असा इशारा व्यापारी संघटनांनी आयुक्तांना दिला आहे.विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया लोकमतशी चर्चेदरम्यान म्हणाले, सध्या सणासुदीचे दिवस आहेत. व्यापाऱ्यांना एक दिवस दुकान बंद ठेवणे परवडणारे नाही. पण आयुक्त विविध आदेश काढून व्यापाऱ्यांना त्रास देत आहेत. राज्यात कुठेही ऑड-इव्हन पद्धत नाही, पण आयुक्तांच्या आदेशानुसार नागपुरात ही पद्धत सुरू आहे. त्यामुळे दुकाने महिन्यात १५ दिवसच सुरू आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर संकट आले आहे. एक दिवसाआड दुकान उघडले तर ग्राहक येतीलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. पूर्वी लॉकडाऊनमध्ये तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे दुकानाचे भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार, बँकांचे हप्ते व व्याज आणि अन्य खर्चासाठी व्यापाऱ्यांना झटावे लागत आहे. तब्बल पाच महिन्यांपासून व्यापारी आर्थिक संकटात आहेत. उत्पन्न तर सोडा त्यांना दुकानाचा खर्च काढणे कठीण झाले आहे. सणांमध्ये ऑड-इव्हन पद्धत रद्द करावी.याशिवाय आयुक्तांनी दुकान सुरू ठेवण्यासाठी मनपाचा परवाना घेणे बंधनकारक केले आहे. हे परवाने झोननिहाय मिळणार आहेत. तसेच परवाने नाकारण्याचा अधिकार झोनमधील अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे अधिकारी आपल्या मर्जीने परवाने देतील किंवा नाकारतील. त्यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळणार आहे. परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्याचे अधिकारही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या डोक्यावर सतत टांगली तलवार राहणार आहे. व्यापाऱ्यांवर आधीच विविध खर्चाचा बोजा आहे. जीएसटी भरणेही बंधनकारक आहे. त्यानंतर मनपाच्या विविध आदेशाचे पालन करणेही महत्त्वाचे आहे. सर्व गोष्टी सांभाळून व्यवसाय कसा करायचा, याची व्यापाऱ्यांना चिंता आहे. कायद्यातील तरतुदीनुसार व्यापाऱ्यांना परवाने केवळ ज्वलनशील पदार्थांच्या व्यवसायासाठी बंधनकारक आहे, अन्य व्यवसायासाठी नाहीत. याची माहिती आयुक्तांना दिली आहे, असे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.मेहाडिया म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची व्यापाऱ्यांना चिंता आहे. त्याकरिता व्यापारी उपाययोजना करीत आहेत. ग्राहकांची काळजी घेत व्यापारी दुकानात सॅनिटायझर, मास्कचा उपयोग करीत असून कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोव्हज दिले आहेत. शिवाय नियमितपणे दुकान सॅनिटाईझ्ड करीत आहेत. यानंतरही व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना आयुक्तांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.किती व्यापाऱ्यांनी चाचणी केली, याची आकडेवारीच नाही.१८ऑगस्टनंतर मनपाचे अधिकारी चाचणी प्रमाणपत्र नसलेल्यांवर दुकान बंदची कारवाई करणार आहे. नागपुरात ३० हजारांपेक्षा जास्त दुकाने आणि ७० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास १ लाख लोकांची कोरोना चाचणी आयुक्तांच्या आदेशानंतर पाच दिवसांत पूर्ण झालेली नाही. पुढे काय होणार याची व्यापाऱ्यांना चिंता आहे. आतापर्यंत किती व्यापारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली, याची आकडेवारी उपलब्ध नाही. आर्थिक नुकसानीत व्यापाऱ्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे शक्य नसल्याचे मेहाडिया म्हणाले. आयुक्तांच्या आदेशातील जाचक अटी मागे घेण्यासाठी १९ऑगस्टला एक दिवसाचे व्यापार बंद आंदोलन केले होते. पुढे आयुक्तांशी चर्चा करणार आहोत. आयुक्तांनी आदेश मागे घेण्याचे आश्वासन न दिल्यास पुढे व्यापारी बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा मेहाडिया यांनी दिला.

टॅग्स :Strikeसंपbusinessव्यवसाय