शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

इंदला जंगलात उष्माघाताने मोराचा मृत्यू

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंदला जंगलात एका मोराचा उष्माघाताने मृत्यू झाला. मोराच्या शवविच्छेदन अहवालावरून ही बाब सिद्ध झाली. उन्हाळ्यातील प्रचंड तापमान वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी

वैभव बाबरेकर - अमरावतीवडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंदला जंगलात एका मोराचा उष्माघाताने मृत्यू झाला. मोराच्या शवविच्छेदन अहवालावरून ही बाब सिद्ध झाली. उन्हाळ्यातील प्रचंड तापमान वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी घातक ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ११ जून रोजी इंदला येथील जंगलातील कोरड्या नाल्यात एक मोर अत्यवस्थ स्थितीत असल्याची माहिती गावकऱ्यांनी वडाळी वनविभागातील अधिकाऱ्यांना दिली. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांच्यासह वनरक्षकांनी ताबडतोब इंदलाच्या जंगलात जाऊन पाहणी केली. अत्यवस्थ अवस्थेतील मोराला विषबाधा झाल्याची शंका प्रथम वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आली. मोराला लगेच उपचाराकरिता पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी औषधोपचार करुन त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले. मात्र, दुसऱ्या दिवशी मोराची प्रकृती बघण्याकरिता वनविभागाचे अधिकारी गेले असता रात्री त्या मोराचा मृत्यू झाल्याचे कळले. मोराच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या मोराचे शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदन अहवालात मोराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यंदाच्या उन्हाळ्यात ४७ डिग्रीच्या वर गेलेल्या तापमानामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांचे प्रचंड हाल झाले. चिमण्या दगावल्या. मात्र, उष्माघाताने मोराचा मृत्यू होण्याची घटना प्रथमच उघडकीस आली आहे.