शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

ट्रॅफिक वाढतेय !

By admin | Updated: May 11, 2015 02:15 IST

नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी ...

नागपूर : नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश्श हॉर्न, वाढते अपघात असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ १० टक्केही नाही. शहरात २०१४ पर्यंत १२ लाख ७२ हजार ७० विविध वाहनांची नोंद झाली आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. त्यातच वाहने थांबविण्याच्या व उभ्या करण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणांमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्यइतर खासगी वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. २०१३ मध्ये १० लाख ३२ हजार ६०७ झाली तर २०१४ मध्ये ही संख्या १० लाख ६४ हजार ५७४ वर गेली आहे. दुचाकीच्या पाठोपाठ चारचाकीमध्ये मोटार कार्सची संख्या मोठी आहे. २०१४ मध्ये १ लाख ८ हजार १९५वर गेली आहे. (प्रतिनिधी)खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडीचे कारणनागपूरची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढतेय, अशी ओरड केली जाते. मात्र गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनीच वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये खासगी वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, मागील वर्षांपर्यंत ही संख्या पावणेतेरा लाखांपर्यंत पोहचली आहे. वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे जनआक्रोश या सामाजिक संस्थेचे सचिव रवी कासखेडीकर यांचे म्हणणे आहे. खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक शहरातील कोणत्याही मुख्य चौकात गर्दीच्या तासांमध्ये तासभरही उभे राहणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत (स्टार बसेस) खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक असल्याचे दिसून येते. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, आॅटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने असतात.