शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
3
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
4
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी संकटमोचक ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
5
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
6
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
7
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
8
आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
9
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
10
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
11
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
12
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
13
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
14
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
15
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
16
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
17
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
18
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
19
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
20
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाघ वाढतायेत, जंगल कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:54 IST

वाघांची वाढती संख्या लक्षात घेता व वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहावे, तसेच मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी त्यांना अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाने सहा आठवड्यात आराखडा सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त जंगल विकासाचा आराखडा सादर करा : हायकोर्टाचे वन विभागाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघांची वाढती संख्या लक्षात घेता व वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहावे, तसेच मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी त्यांना अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाने सहा आठवड्यात आराखडा सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील गावांमध्ये टी-१ वाघिणीने मागील वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. तसेच १० नागरिकांचे प्राण घेतले, असे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी वाघिणीला ठार मारण्याची विनंती केली आहे. वन विभागाने गोळा केलेल्या नमुन्यांवरून वाघिण नरभक्षक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले. या वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तीन महिन्यांपासून जंगल पालथे घातले. मात्र, तिला पकडण्यात वन विभागाला अपयश आले होते. यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २९ जानेवारीला तिला दिसताक्षणीच गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिले. या आदेशाला वन्यजीवप्रेमी सरिता सुब्रमण्यम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर वाघिणीला ठार मारण्याऐवजी बेशुद्ध करण्याचे आदेश दिले होते.याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, टिपेश्वर व ताडोबा वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. या वनक्षेत्रातील अनेक वाघांचे पांढरकवडा वनक्षेत्रात स्थलांतर झाले आहेत. मात्र, याठिकाणी गवती जंगलाचे प्रमाण कमी असल्याने हरीण व इतर प्राण्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे वाघाने अन्नाच्या शोधात गावाकडे आपला मोर्चा वळविला असून मनुष्य-वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे. राज्य सरकारने वन विकास महामंडळाला (एफडीसीएम) ३१ हजार हेक्टर आरक्षित जंगल विकासासाठी दिले आहे. या जंगलाचा काही भाग पांढरकवडा वनक्षेत्राला लागून आहे. तो भाग शासनाने परत घेऊन त्या ठिकाणी वाघांना अन्नासाठी अनुकूल राहील अशा अतिरिक्त जंगलाचा विकास करावा. जेणेकरून वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहतील व मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता येईल, ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत न्यायालयाने वन्यजीवांसाठी अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्यासंर्भातील विकास आराखडा सादर करण्याचे वन विभागाला आदेश दिले. याप्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रवींद्र खापरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ