शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंधूक दिसण्याच्या समस्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 10:37 IST

Health Nagpur News 'मायोपिया' म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी हे प्रमाण १०० मध्ये पाच ते सात रुग्णांवर होते. आता ते १० ते १५ रुग्णांवर आल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमायोपिया आजाराचे रोज १० ते १५ रुग्ण स्क्रीन टाईम वाढल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा फटका केवळ बाधित रुग्णांनाच बसला नाही तर वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम करण्यांनाही बसला आहे. विशेषत: मुलांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप, मोबाईल व टीव्ही बघण्यात जात आहे. स्क्रीन टाईमचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, 'मायोपिया' म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी हे प्रमाण १०० मध्ये पाच ते सात रुग्णांवर होते. आता ते १० ते १५ रुग्णांवर आल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या या काळात सुरुवातीला लॉकडाऊन असल्याने मोठ्या संख्येत पालक घरीच होते. आजही अनेक पालक घरूनच काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा बंद असल्या तरी आॅनलाईन वर्ग सुरू आहे. काही शाळांमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे पूर्ण वर्ग होतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवर जातो. अशा गॅझेटचा जास्त वापर केल्याने जवळच्या वस्तू सहज दिसत असल्या तरी दूरचे दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जीवनसत्त्वयुक्त नसलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि मोबाईल फोनचा मयार्देपेक्षा जास्त वापर याला कारणीभूत ठरत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ह्यमायोपियाह्ण असलेल्या व्यक्तीला जवळ असलेल्या वस्तू नीट दिसतात. परंतु दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण येते. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्यामुळेदेखील मायोपिया होऊ शकतो.मेयोच्या नेत्ररोग विभागात रुग्ण वाढलेमेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण म्हणाले, कॉर्नियातील बिघाड, औद्योगिकीकरण, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर, आनुवंशिकता, घरांमध्ये बसून तासन्तास लॅपटॉपवर काम करणे किंवा मोबाईल पाहणे अशा विविध कारणांमुळे शहरी भागातील लोकांमध्ये मायोपिया ही समस्या वाढत आहे. मेयोच्या नेत्ररोग विभागात पूर्वी १०० मधून पाच ते सात रुग्ण यायचे, परंतु अलीकडे १० ते १५ रुग्ण येत आहेत.गॅझेटचा वापर ठरविणे आवश्यकअलीकडे मोठ्यांसह लहान मुलांकडून लॅपटॉप व मोबाईलचा वापर वाढला आहे. परंतु या गॅझेटचा वापर किती करावा, हे ठरवून घेतले पाहिले. यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. सोबतच नियमित व्यायाम करावा, यासाठी धावणे, चालणे आणि योग करणे फायदेशीर ठरू शकते. नियमित नेत्र तपासणीसोबतच योग्य चष्मा किंवा लेन्सचा वापर करावा.-डॉ. रवी चव्हाणप्रमुख, नेत्ररोग विभाग, मेयो

टॅग्स :Healthआरोग्य