शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:01 IST

Nagpur News पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते ६ वर्षे वयोगटात २०१६-१७ मध्ये अतितीव्र ५९७, तर तीव्र २७३० कुपोषणग्रस्त बालकांची संख्या होती. २०२०-२१मध्ये ती वाढून अतितीव्र १५६९, तर तीव्र स्वरूपातील ९७०२ बालकांची संख्या झाली.

ठळक मुद्देपूर्व विदर्भातील कोरोना काळातील धक्कादायक स्थिती अतितीव्र १५६९, तर तीव्र स्वरूपातील ९७०२ बालके

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते ६ वर्षे वयोगटात २०१६-१७ मध्ये अतितीव्र ५९७, तर तीव्र २७३० कुपोषणग्रस्त बालकांची संख्या होती. २०२०-२१मध्ये ती वाढून अतितीव्र १५६९, तर तीव्र स्वरूपातील ९७०२ बालकांची संख्या झाली. कुपोषणाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा कुठे कमी तर पडत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी पोषण आहार व अमृत आहार योजना राबविली जात आहे. यात ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी कोरोनाचा पूर्वीपासून घरपोच आहार दिला जात होता, तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीमध्ये आहार शिजवून तो दिला जात होता; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच २० मार्च २०२०पासून या मुलांनासुद्धा घरपोच आहार देणे सुरू आहे. स्तनदा मातांनासुद्धा घरपोच आहार दिले जात आहे. तीव व अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांसाठी अमृत आहार योजना आहे. या अंतर्गत गर्भवती राहण्यापासून ते प्रसूतीनंतर बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत अंगणवाडीमध्ये दुपारच्यावेळी चौरस आहार दिला जात होता, तर दोन्ही प्रकारातील ६ महिन्यांपासून ते ६ वर्षांपर्यंत असलेल्या बालकांना आठवड्यातून चार दिवस केळी किंवा अंडी दिली जात होती; परंतु कोरोना काळात अंगणवाडी सेविकेमार्फत अन्न शिजवून थेट लाभार्थ्यांच्या घरी डबा पोहोचवून दिला जात आहे. असे असतानाही दोन्ही स्वरूपातील बालकांची संख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

-कुपोषणग्रस्तांची संख्या कमी

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८-१९ मध्ये शून्य ते ६ वर्षांपर्यंतची ५९,९८४१ कुपोषणग्रस्त बालकांची नोंद झाली होती. २०१९-२०मध्ये ही संख्या वाढून ६०,०६६८ झाली; परंतु २०२०-२१मध्ये पुन्हा कमी होऊन ५७, ५७४२वर आली.

-अतितीव्रमध्ये ०.१ टक्का, तर तीव्रमध्ये १.४ टक्क्याने वाढ

पूर्व विदर्भात २०१८-१९ मध्ये अतितीव्र ११९८ (०.२ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ६१६६ (१.० टक्के) बालकांची नोंद झाली. २०१९-२० मध्ये ती कमी होऊन अतितीव्र १४६४ (०.२ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ५५८८ (०.९ टक्के) बालके आढळून आली. मात्र, २०२०-२१ मध्ये त्यात वाढ होऊन अतितीव्र स्वरूपातील १५६९ (०.३ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ९७०२ (१.७ टक्के) बालकांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अतितीव्र बालकांमध्ये ०.१ टक्का, तर तीव्र बालकांमध्ये १.४ टक्क्याने वाढ झाली.

- १०पट मृत्यूचा धोका अधिक

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या निर्देशकांनुसार तीव्र आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त असलेल्या शून्य ते ५ वयोगटातील बालकांना मृत्यूचा धोका १० पट अधिक असतो. यामुळे या बालकांकडे कोरोना काळातही विशेष लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.

 

टॅग्स :Melghatमेळघाट