शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

डेंग्यूच्या विळख्यात उपराजधानी,डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढले रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:05 IST

परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. याचा प्रभाव डासांचा प्रादूर्भावावरही झाला आहे. विशेषत: उपराजधानीवर डेंग्यूच्या विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे.

ठळक मुद्देमनपाच्या आरोग्य समितीने घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. याचा प्रभाव डासांचा प्रादूर्भावावरही झाला आहे. विशेषत: उपराजधानीवर डेंग्यूच्या विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. मनपा आरोग्य विभाग आतापर्यंत डेंग्यूचे ४०० रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाल्याचे सांगत असलेतरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. बहुसंख्य रुग्णालयाच्या खाटा डेंग्यू रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. या शिवाय, डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यावर शुक्रवारी आरोग्य समितीने बैठक घेऊन आढावा घेतला.डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाला घेऊन आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी बैठकीत उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना जिथे पाणी साचलेले आहे त्यावर औषध फवारणी करण्याचे निर्देश दिले. सोबतच ज्या पाण्यामध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत, त्यांना नोटीस देण्याचे आणि दंडात्मक कारवाई करण्याचा सूचनाही दिल्या आहेत. वॉटसअ‍ॅप व सोशल मिडीयाच्या मदतीने डेंग्यूच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती करणारे मॅसेज देण्याचेही त्यांनी सूचविले.मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी बैठकीत सांगितले, जिथे डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहे तिथे औषध फवारणी केली जात आहे. घरातील अन्य सदस्यांचीही तपासणी केली जात आहे. लोकांना जागरूक करण्याचे कार्यही केले जात आहे. रिकाम्या प्लॉटवर पाणी जमा होणार नाही या संदर्भातील दिशा-निर्देशही देण्यात आले आहे. खासगी इस्पितळांना डेंग्यू व डेंग्यू सदृश्य रुग्णांची माहिती देणे अनिवार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्णसप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू सदृश्य आजाराचे ९४२ रुग्ण आढळून आले. यात ३३० डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात १९४ डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात १०९८ डेंग्यू संशयीत रुग्णांची नोंद झाली असून यात डेंग्यूचे ३९५ रुग्ण आहेत.घराघरांची तपासणी व जनजागृतीमहानगरपालिकेच्या मलेरिया व फायलेरिया रोग विभागाकडून घराघरांची तपासणी केली जात आहे. यात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येणाऱ्यांना नोटीस दिली जात आहे. पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुलरच्या टाक्यापासून ते पाण्याचे ड्रम, फुलदाणी, कुंड्या, नाराळाच्या रिकाम्या कवट्या, टायर आदीमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत आहेत. कर्मचारी हे पाणी फेकून किंवा त्यामध्ये औषध फवारणी करून उपाययोजना करीत आहेत. या सोबतच डेंग्यू बाबत जनजागृती करून सात दिवसांवर पाणी जमा होणार नाही याची माहिती देत आहे. काही भागातील विहिरी व टाक्यात गप्पी मासेही सोडले जात आहे

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdengueडेंग्यू