शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीत सुरक्षेवर देणार जास्त भर; थरावर थर पण नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो.

ठळक मुद्देतीन वर्षांत पाच गोविंदा झाले जायबंदी; गोपिकांची पथके, हजारोंची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणित करण्यात येत असला तरी, थरावर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या तीन वर्षांत नागपुरात पाच गोविंदा जायबंदी झाले आहेत. सुदैवाने गेल्या काही वर्षांत जीवितहानी झालेली नाही. दहीहंडी करा परंतु दुर्घटना टाळण्यासाठी नियम पाळा, असे सांगण्याची वेळ आली आहे.दहीहंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरुणाईत जास्त दिसून येतो. विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. प्रारंभी सर्वात उंच थरासाठी लाखो रुपयांचे बक्षीस होते. थर जसजसे कमी होतात, तशीतशी बक्षिसांची रक्कमही कमी होते. या उत्सवामुळे स्थानिक युवक सक्रिय होतात. वरच्या थरावरून गोविंदा पथकातून कुणी खाली पडला तर सुरक्षेच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे गोविंदाला इजा होत नाही. प्रसंगी उपचारासाठी डॉक्टर्स आणि अ‍ॅम्ब्युलन्स असते. इतवारीतील गोपिकांच्या दहीहंडीसाठी थर कमी असतो. सुरक्षा व्यवस्था तगडी असते. गोपिकांच्या पथकांना उपस्थितांकडून प्रोत्साहन दिले जाते. नागपुरात दहीहंडी उत्सवाची जवळपास ५० वर्षांची परंपरा आहे. काही मंडळांनी सुरक्षेच्या कारणांनी दहीहंडी बंद केली असली तरीही, अनेक मंडळातील तरुणांनी यंदा दहीहंडी उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुरक्षेबाबत दक्षता घेतली जाणार आहे.

नागपूरची परंपरा उत्सवाची राहिली आहे. येथे सर्व धर्माचे लोक मिळून उत्सव साजरे करतात. ही परंपरा कायम राहावी. स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा सांभाळून दहीहंडीचा उत्सव साजरा करा. धोका पत्करू नका आणि कुणालाही धोका निर्माण होईल, असे वागू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका.- डॉ. भूषणकुमार उपाध्यक्ष, पोलीस आयुक्त, नागपूर शहर.

नागपुरात सहा वर्षांपासून गोपिकांच्या दहीहंडी उत्सवाने वेगळी परंपरा सुरू केली आहे. अर्थात, हा साहसी क्रीडा प्रकार असून त्यामुळे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळतो. उंचीबाबत हायकोर्टाचे नियम पाळण्यात येतात. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गोविंदाची पथके सहभागी होतात. या उत्सवात दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. गेल्या ३८ वर्षांपासून कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

- संजय खुळे, अध्यक्ष, इतवारी नवयुवक मंडळ.

दहीहंडी उत्सवात मध्य प्रदेश व छत्तीसगडचे गोविंदा पथकपूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरात दहीहंडीचा उत्सवाचा जोर दिसून येतो. संपूर्ण नागपुरात ३० पेक्षा जास्त मंडळ असले तरीही इतवारी, हिवरीनगर, संगम टॉकीज, नंदनवन, अयोध्यानगर, सहकारनगर या भागातील जुन्या मंडळाच्या उत्सवाचे स्वरूप व्यापक आहे. या ठिंकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी होते. एक-दोन वर्षांपासून या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. त्यामुळे स्पर्धा वाढते. यावर्षी नंदनवन भागातही उत्सवाचे स्वरूप मोठे राहणार आहे. इतवारीतील एकमेव गोपिकांच्या दहीहंडी उत्सवात जवळपास पाचे पथके असतात. याशिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील आणि तालुक्यातील युवकांची पथके येतात. पाच ते सात थराच्या पलीकडे ते जात नाहीत.

अशी आहे नियमावली१८ वर्षांखालील गोविंदाचा सहभाग नसावा.२० फुटापेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करू नये.कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश डीजेचा वापर शक्यतो टाळावा.आपात्कालीन व्यवस्था असावी.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी