शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत पर्यटनस्थळांवर वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:35 IST

दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटनस्थळांवर आणि धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. नागपूरपासून ६० ते १०० किलोमीटर अंतरावरील एक दिवसीय पर्यटनासाठी नागरिक पसंती देत आहेत. याशिवाय दिवाळीच्या काळात फार्म हाऊसवरील पार्ट्या वाढल्या आहेत.

ठळक मुद्देजंगल सफारीची क्रेझ : फार्म हाऊसवरील पार्ट्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटनस्थळांवर आणि धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. नागपूरपासून ६० ते १०० किलोमीटर अंतरावरील एक दिवसीय पर्यटनासाठी नागरिक पसंती देत आहेत. याशिवाय दिवाळीच्या काळात फार्म हाऊसवरील पार्ट्या वाढल्या आहेत.दिवाळीच्या सुट्यात अनेक नागरिकांनी विदर्भातील पर्यटनस्थळांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत शासकीय कार्यालयांना यंदा पाच दिवसाच्या सुट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हे पाच दिवस कुटुंबासह घालविण्यासाठी आधीच नागपूरकरांनी आपले नियोजन केले आहे. यात खिंडसी येथे पर्यटनासाठी नागरिक मोठी गर्दी करीत असून तेथील बोटिंगचा आनंद घेत आहेत. याशिवाय येथे निवासाची व्यवस्था असल्यामुळे मागील पाच दिवसांपासून खिंडसीत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. याशिवाय चिखलदरा, नवेगाव बांध, तोतलाडोह येथेही पर्यटनासाठी गर्दी वाढली आहे. अनेकांनी देव दर्शनासाठी रामटेक येथील गडमंदिर आणि आदासाची निवड केल्यामुळे या धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. याशिवाय वाकी येथील ताजुद्दीन बाबांच्या दर्शनासाठी आणि पारडसिंगा येथील मा अनसूया मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. रविवारपर्यंत धार्मिक आणि पर्यटनस्थळांवरील ही गर्दी कायम राहणार आहे.जंगल सफारीची क्रेझदिवाळीच्या सुट्यात पर्यटनासाठी नागरिकांनी जंगल सफारीसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. यामुळे पेंच, ताडोबा अभयारण्य येथे मोठ्या संख्येने नागरिक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. या पर्यटनस्थळांवर वन विभागाच्या आॅनलाईन बुकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. तर अनेकजण मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्याला भेट देत आहेत.फार्म हाऊसवर वाढल्या पार्ट्यादिवाळीत नागपूरशेजारील फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात पार्ट्या वाढल्या आहेत. अनेकजण बालगोपाल, कुटुंबीयांसह फार्म हाऊसवर गर्दी करीत आहेत. एक दिवसीय पर्यटनासाठी कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत पार्ट्यांचा बेत आखल्या जात आहे. तर मित्रांचे ग्रुपही मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी जात आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनDiwaliदिवाळी