शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

मोक्षप्राप्तीसाठी पुण्य वाढवा

By admin | Updated: November 16, 2014 00:47 IST

जीवनात केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब मृत्यूनंतर ईश्वराला द्यावा लागतो. जीवनात पाप अधिक घडले असेल तर मोक्ष मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक जीवात्म्याने आपल्या जीवनात पुण्याचे ‘अकाऊंट बॅलेंस’

स्वामी विष्णुस्वरूपानंद सरस्वती : सप्तक आणि काळे फाऊंडेशन ट्रस्टचा उपक्रमनागपूर : जीवनात केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब मृत्यूनंतर ईश्वराला द्यावा लागतो. जीवनात पाप अधिक घडले असेल तर मोक्ष मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक जीवात्म्याने आपल्या जीवनात पुण्याचे ‘अकाऊंट बॅलेंस’ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी विष्णुस्वरूपानंद सरस्वतीजी यांनी आज येथे केले.सप्तक आणि काळे फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित ‘गजेंद्र मोक्ष’ (श्रीमद्भागवत कथेवर आधारित ईश्वर प्राप्तीचा मंत्र) या विषयावर ते बोलत होते. स्वामी विष्णुस्वरूपानंद सरस्वती म्हणाले, संसारात दु:ख नसलेला कुणीच नाही. प्रत्येक जीव पीडित आहे. त्यामुळे तो दु:खापासून निवृत्तीची साधने शोधतो. दु:खापासून मुक्ती म्हणजे मोक्ष होय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हवा असणारा भक्त अर्थार्थी असतो. असे भक्त संकट आले की ईश्वराचे स्मरण करतात. द्रोपदीही त्यातील एक आहे. त्रिकुटाचल पर्वतातील गजेंद्र नावाच्या हत्तीत १० हजार हत्तींचे बळ होते. जलक्रीडा करताना त्याला मगरीने पकडल्यानंतर त्याने ईश्वराचे स्मरण केले. ईश्वराला जाब देण्यासाठी संसारातील भोगावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. ईश्वराने इंद्रियाला निरोगी बनविण्यासाठी बनविले. माणूस शरीराला विषारी बनवत आहे. संसारात परिवर्तन न होणारी कोणतीही वस्तू नाही. मृत्यू म्हणजे दृश्यापासून अदृश्य होणे होय. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळत असल्याने प्रत्येकजण मृत्यूकडे जातो. जीवन भक्तिमय करण्यासाठी विलंब करू नका. माणसाचा अहंकार त्याला कुणापुढे वाकू देत नाही. चार पुरुषार्थापैकी धर्म, अर्थ, काम हे अनित्य तर मोक्ष हा नित्य आहे. प्रत्येकाने मृत्यूची तयारी करणे गरजेचे आहे. संसारात विवेक जागविण्यासाठी जीवात्म्याला एकटे ठेवा. या जन्मात केलेले कर्म पुढील जन्मात कामाला येतात. पुण्य, पापाशिवाय अखेर कुणीच सोबत येत नाही. प्रत्येकाला ईश्वराचा आधार हवा आहे. आधार नसल्यास निराधार जीव भटकतो. त्यामुळे गजेंद्रने ईश्वराला अखेरच्या क्षणी पुष्प समर्पित करून अविद्यारूपी शरीरापासून मुक्तीची मागणी केली. सुमनाप्रमाणे मनही एक पुष्प आहे ते सुद्धा ईश्वराला देण्याची गरज आहे. सध्या जीवनात जे मिळते ते पूर्वीच्या जन्मातील पुण्यामुळे मिळते. भागवत कथेमुळे मानसाचे जीवन दिव्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनुराधा मुंडले यांनी स्वामीजींचे स्वागत केले. प्रास्ताविक कुमार काळे यानी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)