शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाईत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:48 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वधारल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. डिझेल ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर पडला असून आठ दिवसांत भाडे ८ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंसह फळे आणि भाजीपाला महागला आहे.

ठळक मुद्देमालवाहतूक भाडे ८ ते १० टक्क्यांनी वाढले : दैनंदिन उपयोगाच्या वस्तू महाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वधारल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. डिझेल ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर पडला असून आठ दिवसांत भाडे ८ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंसह फळे आणि भाजीपाला महागला आहे.मालवाहतूकदारांनी सांगितले की, १० टन क्षमतेच्या वाहनांच्या मालवाहतूक भाड्यात कि़मी.च्या आधारावर १० ते १५ टक्के वाढ झाल्यामुळे ट्रकमधून जाणारा मालही महाग झाला आहे. वाहन आणि मायलेजच्या आधारावर किमतीत वाढ होत आहे. मालवाहतुकीसाठी जास्तीत जास्त १० टन क्षमतेच्या वाहनांचा उपयोग करण्यात येतो. त्याचा मायलेज सहा ते सात कि़मी. आहे. अशा वाहनांचे भाडे दोन हजारांपेक्षा जास्त वाढले आहे.छोट्या मालवाहतूकदारांचे प्रति ट्रीप भाडे वाढलेकळमना बाजारात फळे आणि भाजीपाला आल्यानंतर किरकोळ बाजारात विक्रीला नेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या छोट्या मालवाहतूकदारांचे प्रति ट्रीप भाडे वाढले आहे. या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी सांगितले की, सुमारे १५० रुपये प्रति ट्रीपमध्ये वाढ झाली आहे. अंतर आणि वजनाच्या आधारावर भाडे आकारण्यात येत आहे. कळमना बाजारात पोहोचणे आणि तेथून शहराच्या अन्य बाजारात फळे आणि भाजीपाला पोहोचविण्यापर्यंतचा खर्च पेट्रोल आणि डिझेल भाववाढीमुळे ग्राहकांना उचलावा लागत आहे.जास्त क्षमतेच्या ट्रकच्या मागणीत घटया संदर्भात गांधीबाग येथील ट्रान्सपोर्टर कुक्कू मारवाह यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटी आणि आता डिझेलच्या भाववाढीमुळे ट्रान्सपोर्टरचा व्यवसाय ठप्प झाला आहे. भाडे वाढल्यामुळे मोठ्या वाहनांची मागणी कमी झाली आहे. मायलेजमुळे व्यापारी छोट्या वाहनांद्वारे कमी अंतरावर माल पोहोचवित आहेत. तीन ते चार व्यापाऱ्यांचा माल कमी क्षमतेच्या एकाच वाहनांमध्ये पाठविण्यात येत आहे. अशा स्थितीत १० टनपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांची मागणी कमी झाली आहे. आठ ते दहा दिवसांत १६ टन, २१ टन आणि २७ टन क्षमतेच्या वाहनांमधून माल फारच कमी प्रमाणात जात आहे. नागपुरात पाच ते सात हजार ट्रक असून त्यांचे मालक आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट आले आहे. १५०० रुपयांपर्यंत फरकपेट्राल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे गेल्या काही दिवसात मालवाहतूक भाडे १० ते १५ टक्के अर्थात १५०० रुपयांपर्यंत वाढले आहे. अशा स्थितीत बाजारात येणाऱ्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंवर तेजीचा परिणाम झाला आहे.प्रकाश वासानी, माजी अध्यक्ष,आलू-कांदे अडतिया असो. कळमना.मालवाहक वाहनांचे भाडे वाढलेडिझेलचे दर वाढल्यामुळे वाहनांचे प्रति कि़मी. भाडेसुद्धा वाढले आहे. त्यामुळे अंतर आणि मायलेजच्या आधारावर मालवाहतूक होत आहे. शहरात धावणाऱ्या वाहनचालकांनी प्रति ट्रीपमध्ये १५० रुपयांची वाढ केली आहे.नंदू गौर, अध्यक्ष,भाजी मार्केट, कळमना.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल