शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

साऊंड व्यावसायिकांना डेसिबल वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:37 IST

पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रविकांत पवनीपगार आणि चिंतेश्वर वंजारी यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देसाऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रविकांत पवनीपगार आणि चिंतेश्वर वंजारी यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे अडविला. मोर्चात सहभागी साऊंड व्यावसायिकांनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी केली. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे कपडे घालून साऊंड व्यावसायिकांनी शासनाच्या साऊंड व्यावसायिकांबद्दलच्या धोरणाचा निषेध केला.मोर्चात साऊंड सिस्टीम वाजविण्यासाठी त्या ठिकाणच्या पर्यावरणाच्या आवाजात १५ डेसिबल अतिरिक्त द्यावे, प्रशासनाला साऊंड सिस्टीमवर बंदी लावायची असल्यास साऊंड व्यावसायिक आणि कलाकारांची पर्यायी व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या. साऊंड सिस्टीमवर बंदी घातल्यास पोवाडे, भारुड, शास्त्रीय संगीत, गायन नृत्यकला यासारख्या प्राचीन कला लोप पावतील, असा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला. त्यानंतर रविकांत पवनीपगार, चिंतेश्वर वंजारी, सचिन काटे, भगवान भोईर, अनिल साळुंखे यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. गृहराज्यमंत्र्यांनी साऊंड व्यावसायिकांवर कारवाई होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे सांगून इतर मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व रविकांत पवनीपगार, चिंतेश्वर वंजारी कार्यकर्ते : सचिन काटे, भगवान भोईर, अनिल साळुंखे आदींनी केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा