शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कळमना भाजी बाजारात खरेदी-विक्री वेळ वाढवावी; अडतियांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:09 IST

कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांना भाज्या विक्रीला वेळ मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, बाजारात २०५ अडतिया असून दररोज ५० च्या बॅचला व्यवसाय करायचा आहे. व्यवसायाची वेळ रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत ठेवली आहे. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तसेच प्रत्येक अडतियाला दोन गाड्या भाज्या विकण्याची परवानगी आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी ६.३० पासूनच समितीच्या कर्मचाºयांनी बाजार बंद करायला सुरुवात केली आणि सकाळी ७ वाजता बाजार बंद केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाज्या विक्रीविना परत जावे लागले. हीच स्थिती रविवारी होती. भाज्या विक्रीसाठी एक तर कमी वेळ मिळाला शिवाय दुचाकीला प्रतिबंध आणि ठराविक संख्येत तीनचाकीला परवानगी असल्याने फार कमी विक्रेते ग्राहक बाजारात आले. त्यामुळे बाजाराची वेळ पहाटे ४ ते सकाळी १० पर्यंत केल्यास किरकोळ विक्रेत्यांना खरेदीला वेळ मिळेल आणि शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री होईल, असे गौर म्हणाले.गर्दी होऊ नये म्हणून समितीने बाजाराला मुख्य भाजी बाजार, १ ते ६ इमारतीतील १४४ गाळे, आणि न्यू गे्रन मार्केट अशा तीन भागात विभागले आहे. हे अंतर कळमन्याच्या चिखली बाजारापासून अर्धा ते पाऊण किमी आहे. त्यामुळे ग्राहक न्यू ग्रेन मार्केटमधील भाजी बाजारात जात नाहीत. शनिवारी आणि रविवारी ग्राहक या बाजाराकडे फिरकले नाहीत. अखेर शेतकऱ्यांना भाज्या परत न्याव्या लागल्या. भाज्या कुठे विकायच्या, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर गेटबाहेर बसून त्यांना विक्री करावी लागली. तेथूनही कर्मचारी आणि पोलिसांना त्यांना हाकलून लावले. समितीने वेळ निश्चित करताना अडतिया आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. वेळ वाढल्यास भाज्यांच्या खरेदी-विक्रीची सुविधा होईल, असे गौर म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस