शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर व चंद्रपूर येथील कोळसा व्यावसायिकांवर आयकर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:26 IST

पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे करचुकवेगिरी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त, कारवाई उद्याही सुरू राहणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर/चंद्रपूर : पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.नितीन उपरे, संजय अग्रवाल, रणजित छाबडा व मित्तल हे चंद्रपूर येथील स्वामी फ्युएल कंपनीचे संचालक तर संजय अग्रवाल हे सूर्या ट्रान्सपोर्टचे संचालक आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय चंद्रपूर येथे असून सर्व संचालकांचे निवासस्थान नागपुरात आहेत. कंपनीचे चंद्रपूर, वणी, घुग्घुस व उमरेड येथेही कार्यालय आहेत. अधिकाऱ्यांनी नितीन उपरे यांच्या नागपुरातील रामदासपेठ तर संजय अग्रवाल यांच्या छाप्रूनगर, वर्धमाननगर, सूर्यनगर आणि कोराडी येथील कार्यालय व निवासस्थानावर धाडी टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील कर्नाटक-एम्टा कोळसा खाण कर्नाटक पॉवर प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली होती. पुढे प्रकल्प बंद झाला. त्यामुळे सन २०१२ मध्ये खाणीतून कोळशाचे उत्खननही बंद झाले. पण वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाणीतून गेल्या पाच वर्षांपासून कोळशाचे अवैध उत्खनन सुरू आहे. महिन्याला एक लाख टन कोळशाचे उत्खनन करण्यात येते. ८०० रुपये टन किमतीच्या कोळशाची कंपन्यांना ६ हजार रुपये टन भावाने विक्री करण्यात येत होती. २०० रुपये वाहतूक खर्च वगळता व्यावसायिक एका टनामागे ५ हजार रुपये नफा कमवित होते. या व्यवहारात चारही व्यावसायिकांनी करचुकवेगिरी करीत काही वर्षांतच कोट्यवधींचे उत्पन्न मिळविले आहे. याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागाच्या जवळपास १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकत्रितरीत्या धाडी टाकल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर धाडी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाड