नोटाबंदीनंतरचे पोस्टमार्टम : पैशाचा स्रोत वा प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार नागपूर : नोटाबंदीनंतर बँकेत जास्त प्रमाणात जमा केलेल्या रकमेचा स्रोत करदात्यांना द्यावा लागणार आहे. बँकेतून प्राप्त माहितीच्या आधारे आयकर विभागाने विदर्भातील पाच हजारांपेक्षा जास्त बँक खातेधारकांना नोटीस पाठविली आहे. त्यामुळे करदात्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बँकेने आयकर विभागाला ८ नोव्हेंबर या नोटाबंदीच्या तारखेसह बँकेत १ एप्रिल २०१६ नंतर व्यवहार केलेल्या खातेदारांची माहिती पाठविली आहे. त्यामुळे १ एप्रिलनंतर बँकेत जमा केलेल्या रकमेचाही स्रोत करदात्यांना द्यावा लागणार आहे. जर एखाद्याच्या खात्यात अज्ञात इसमाने रक्कम जमा केली आणि ती तात्काळ विड्रॉल केली असेल तर अशा खातेदारकांनाही विभागाने नोटीस पाठविली आहे. अशा खातेदाराला केवळ एक प्रतिज्ञापत्र विभागाला द्यायचे आहे. नंतर त्या खातेदाराच्या खात्यात जमा आणि विड्रॉलचा व्यवहार केलेल्या इसमाचा शोध विभाग घेणार आहे. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर विभाग त्या खातेदाराला त्रास देणार नाही, असे मत सीए कैलास जोगानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. पाच हजार खातेधारकांना आयकर विभागाची नोटीस सक्तवसुली संचालनालयाला जप्तीचे अधिकार खातेदाराचे पैसे जप्त करण्याचे अधिकारी आयकर विभागाला नाहीत. पण पुढे कारवाईदरम्यान हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. अज्ञात इसमाने एखाद्या खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम जप्त करण्याचे अधिकार सक्तवसुली संचालनालयाला आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोटीस मिळालेले दररोज तीन ते चार खातेदार नागपूर आयकर विभागाकडे येत आहेत. अज्ञात इसमाने खात्यात लाखो रुपये जमा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा खातेदारांना अधिकारी स्त्रोत उघड करण्यास आणि स्त्रोत नसल्यास प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहेत. याशिवाय नोटीस मिळालेल्या करदात्यांची विभागात गर्दी होत आहे. खातेदाराचे पैसे जप्त करण्याचे अधिकारी आयकर विभागाला नाहीत. पण पुढे कारवाईदरम्यान हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. अज्ञात इसमाने एखाद्या खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम जप्त करण्याचे अधिकार सक्तवसुली संचालनालयाला आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोटीस मिळालेले दररोज तीन ते चार खातेदार नागपूर आयकर विभागाकडे येत आहेत. अज्ञात इसमाने खात्यात लाखो रुपये जमा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा खातेदारांना अधिकारी स्त्रोत उघड करण्यास आणि स्त्रोत नसल्यास प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहेत. याशिवाय नोटीस मिळालेल्या करदात्यांची विभागात गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)
पाच हजार खातेधारकांना आयकर विभागाची नोटीस
By admin | Updated: March 22, 2017 02:39 IST