शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षण सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:55 IST

मुस्लीम समाजाच्या विविध योजनांसाठी महिनाभरात संचालनालय स्थापन करण्यात येईल, तसेच मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात कांबळे यांनी ही घोषणा केली.

ठळक मुद्देदिलीप कांबळे यांची विधानपरिषेदत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुस्लीम समाजाच्या विविध योजनांसाठी महिनाभरात संचालनालय स्थापन करण्यात येईल, तसेच मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात कांबळे यांनी ही घोषणा केली.मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीची लवकरच घोषणा केली जाईल. महामंडळाची रचना पूर्ण झालेली नसली तरी अल्पसंख्याक विभागातर्फे प्रशासकीय कामकाज सुरू असल्याची माहिती दिलीप कांबळे यांनी दिली.राज्यातील अल्पसंख्याक समाजाकरिता शासनातर्फे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ,उर्दू साहित्य अकादमी, वक्फबोर्ड अल्पसंख्याक आयोग आणि हज समिती अशा वेगवेगळ्या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, महामंडळांना सक्षम अध्यक्ष नसणे, यामुळे अल्पसंख्याक समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याचे ख्वाजा बेग यांनी चर्चेच्या माध्यमातून निदर्शनास आणले.सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी हज यात्रेकरूं चे अनुदान बंद केल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सच्चर आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या तर अल्संख्याक समाजाला न्याय मिळेल अशी भूमिका मांडली.नीलम गोऱ्हे यांनीही अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची मागणी केली. हरिभाऊ राठोड यांनी सरकार अल्पसंख्याक समाजाबाबत उदासीन असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाच चुकीचे असल्याचे सांगितले. भाजपाचे गिरीश व्यास यांनी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात २०० कोटींचा गैरव्यहार झाल्याचे सांगून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Dilip Kambleदिलीप कांबळे