शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

१०० ग्रामसभांनी मिळविले ११.६५ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: June 9, 2017 02:40 IST

वनहक्क कायदा २००६ व पेसा या कायद्यामुळे वनांवर उपजीविका करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळाला आहे.

तेंदू संकलनात ग्रामसभेची यशस्वी वाटचाल : २० हजारावर आदिवासी कुटुंबीयांना लाभलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनहक्क कायदा २००६ व पेसा या कायद्यामुळे वनांवर उपजीविका करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळाला आहे. या कायद्यामुळे सामूहिक वनहक्कांतर्गत गौणवनोपजाचे स्वामित्व स्थानिक ग्रामसभांना प्राप्त झाले आहे. ग्रामसभेला मिळालेल्या हक्कामुळे गोंदिया, गडचिरोलीसह नागपूर, अमरावती व यवतमाळ येथील १०० ग्रामसभेने तेंदू संकलन व व्यवस्थापनाची यशस्वी प्रक्रिया राबविली आहे. यावर्षी या १०० ग्रामसभांनी ११.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. देशात ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू व्यवस्थापनाचा यशस्वी उपक्रम या पाच जिल्ह्यात सुरू आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदूपत्ता संकलनाची प्रक्रिया २०१३ पासून सुरू गोंदिया, गडचिरोली, अमरावती व यवतमाळ येथे १६ गावात राबविण्यात आली होती. आज १०० गावांच्यावर ग्रामसभा या प्रक्रियेत जुळल्या आहे. २०१३ - २०१४ व २०१४-१५ मध्ये ग्रामसभेद्वारे करण्यात आलेल्या तेंदूपत्त्याच्या संकलनात कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे दोन वर्ष ग्रामसभेचे मोठे नुकसान झाले. गेल्यावर्षी एका व्यापाऱ्याने ग्रामसभेने केलेले तेंदूचे संकलन हस्तांतरित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे यावर्षी पाचही जिल्ह्यातील ग्रामसभेने या व्यापाऱ्याला संकलित केलेला तेंदूपत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभेने व्यापाऱ्याशी स्पर्धात्मक दर निश्चित करून व्यवहार केला. ग्रामसभेने घेतलेल्या या पुढाकारामुळे २० हजार आदिवासी कुटुंबीयांना त्याचा लाभ झाला. तेंदूपत्त्याचे संकलन करणाऱ्या कुटुंबीयांना निधीचे वाटपही करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू संकलनामुळे वनांचेही संवर्धन झाले आहे. वनांमध्ये आगी लागल्या नाहीत. बुटा कटाई झाली नाही. एकप्रकारे पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण झाल्याचे या पाचही जिल्ह्यातील ग्रामसभेच्या अध्यक्ष व सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितले.