ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी
आतापर्यंत तीन मालिकेत दहा सामने खेळलेला ऑस्ट्रेलिया संघ सात विजय आणि दोन पराभवांसह २९६ गुण घेत अव्वल स्थानावर आहे. भारताने चार मालिकांमध्ये नऊ सामने खेळले. त्यातील सात जिंकले आणि दोन गमावले. एकूण ३६० गुण असले तरी कामगिरीच्या सरासरीनुसार भारत ७५ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आला. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ८२ इतकी आहे. इंग्लंड तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. यानंतर श्रीलंका, वेस्ट इंडिज, द.आफ्रिका आणि बांगलादेशाचा क्रम येतो.