राम दशपुत्रे, धर्मेंद्र फुलवार, व्ही.पी. अहिरे, अयुब मोहम्मद शेख, पी. एस. भेंडे, चित्रा बरडे, एस.जी. भुडके, सुनील माटे, जी. टी. काळकर त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात दोन उपविभागीय अधिकारी पदोन्नतीने येत आहेत. यात पी.बी. शाहू व श्रीकांत ढोके यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या लक्षात घेता, सदर रिक्त पदे भरण्याची कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता. युती सरकारच्या काळात ग्रामविकास विभागासोबत संलग्न असलेला जलसंधारण विभाग स्वतंत्र करून मृद व जलसंधारण विभाग तयार करण्यात आला असून, प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या पदोन्नतीने राज्यात एकाच वेळी १६० जलसंधारण अधिकारी यांची पदे रिक्त झालेली आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या नऊ अधिकाऱ्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST