शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून १५ हजार वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 20:50 IST

जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा वतीने मोर्चा काढून महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून १५ हजार वेतन देण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा वतीने मोर्चा काढून महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून १५ हजार वेतन देण्याची मागणी करण्यात आली.राज्याच्या आरोग्य उपकेंद्रातून १०५०० महिला परिचर १९६६ पासून सेवा करीत आहेत. त्यांना केवळ १२०० रुपये तुटपुंजे मानधन शासनातर्फे देण्यात येते. महिला परिचरांना गृहभेटी, लसीकरण, आठवडी क्लिनिक, प्रसुती प्रकरणे आदी महत्त्वाची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन तुटपुंजे असून महिला परिचरांना १५ हजार मानधनासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी महिला परिचरांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून मागण्या रेटून धरल्या. मोर्चातील शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. वित्तमंत्र्यांनी संघटनेची आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व मंगला मेश्राम, तुळसा काळे, रुख्मिणी पैठणे, मंजुळा बांगर, अलका मेश्राम, लता कांबळे आदींनी केले. लसीकरण सत्राचे परिश्रमक मिळाले पाहिजे,शस्त्रक्रिया शिबिरात रात्रपाळी लावणे बंद करावे,गृहभेटीसाठी प्रवास खर्च देण्यात यावा,मासिक मानधन दर महिन्याच्या १ तारखेला द्यावे आदी मागण्याही मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा