शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मेयोतील प्रकार : मध्यरात्री डॉक्टर करतात तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:33 IST

गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेयोमध्ये खरेच आरोग्याची काळजी घेतली जाते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधीच्या मुलाला दोन तासानंतरही मिळाला नाही उपचार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकप्रतिनिधी असल्याने शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवून त्यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या मुलाला मेयोत दाखल केले. तातडीने उपचार मिळून मुलगा बरा होईल, ही अपेक्षा होती. परंतु अपघात विभाग असतानाही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर यासंदर्भात जाब विचारल्यावर डॉक्टर आले. परंतु त्यांनी उपचार करण्यापेक्षा ‘कोण है वो, बाहर निकालो’ म्हणून वाद घातला. याचे वास्तव सीसीटीव्हीमधून आज समोर आल्याने खळबळ उडाली. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेयोमध्ये खरेच आरोग्याची काळजी घेतली जाते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग परिसरातील एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाची प्रकृती सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अचानक खालावली. त्यांनी तातडीने घरापासून जवळ असलेले मेयो गाठले. केस पेपर काढल्यानंतर ‘मेडिकल कॅज्युल्टी आॅफिसर’ (सीएमओ) यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी पाहिल्यावर अपघात विभागाच्याच वॉर्डमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. येथील एका नर्सने मुलाला सलाईन लावण्यासाठी ‘कॅथेटर’ लावले. परंतु त्यानंतर १ वाजून २२ मिनिटांपासून ते २ वाजून ५० मिनिटांपर्यंत एकही डॉक्टर किंवा नर्सने त्या मुलाकडे पाहिलेसुद्धा नाही. लोकप्रतिनिधीने याबाबत वॉर्डातील डॉक्टरांना व नर्सला किमान सलाईन तरी लावा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दीड ते दोन तासावर वेळ होऊनही उपचार मिळत नसल्याचे पाहत लोकप्रतिनिधीने मुलाला खासगी इस्पितळात घेऊन जातो, असे सांगून नर्सला ‘कॅथेटर’ काढण्याची विनंती केली. परंतु नर्सने ‘मी खाटेजवळ येणार नाही, रुग्णाला माझ्याकडे आणा’, असे फर्मान सोडले. मुलाला आधार देत नर्सजवळ आणले असता, नर्सने उभ्या उभ्याच कॅथेटर काढले. त्यातून रक्त बाहेर येताच मुलगा चक्कर येऊन खाली कोसळला. लोकप्रतिनिधीने याबात जाब विचारला असता, तेथील निवासी डॉक्टरनेच ‘बाहर निकालो’ म्हणून सुरक्षा रक्षकांना बोलाविले. मुलाची प्रकृती पाहून लोकप्रतिनिधीने वाद न घालता तातडीने खासगी इस्पितळ गाठले.लोकप्रतिनिधीने या प्रकरणाची तक्रार मोबाईलद्वारे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्याकडे केली. डॉ. पांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अपघात विभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लोकप्रतिनिधीने सांगितलेला प्रकार खरा निघाला. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधीला दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांचा फोन बंद होता.दोषी डॉक्टर, नर्सवर कारवाई होणारसंबंधित लोकप्रतिनिधीने मोबाईलवरून घटनेची माहिती देत तक्रार केली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, डॉक्टर व नर्स यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते. यामुळे मंगळवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, त्यानंतरच वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. झालेल्या प्रकाराची लोकप्रतिनिधीकडे दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे.डॉ. सागर पांडेप्रभारी वैद्यकीय अधीक्षक, मेयो

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर