शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

प्रभारी कुलगुरूंचे 'मिशन क्लीन-लॅन्ड'

By admin | Updated: May 9, 2014 02:21 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी विद्यापीठात तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांची विशेष बैठक बोलाविली होती. यावेळी संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी अतिक्रमण लवकरात लवकर कसे हटविता येईल याची चाचपणी केली. जेथे सुसज्ज अभ्यासालये उभी राहायला हवी होती, तेथे ढाबे दिमाखाने उभे आहेत. प्रभारी कुलगुरू हे विभागीय आयुक्त असल्यामुळे त्यांच्या 'मिशन क्लीन-लॅन्ड'मुळे विद्यापीठाला हक्काची जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.१९९१ साली क्रीडा संकुलासाठी विद्यापीठाची जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर कोराडी मार्गावर विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आले. परंतु त्या काळात ७.४५ एकर जमिनीवर हॉटेल व ढाब्यांचे अनधिकृतपणे निर्माण करण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कायदेशीररीत्या कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात याचा आढावा गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अतिक्रमण झालेल्या जागेवरील वर्तमान स्थितीची माहिती त्यांनी घेतली. या जागेवर तब्बल १२ लोकांनी अतिक्रमण केले आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली. या बैठकीला प्रभारी कुलगुरू अनुपकुमार, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, अप्पर जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावार आणि उत्पादन शुल्क अधीक्षक वरदे हे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)