नागपूर : लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शोचे उद्घाटन शुक्रवार, १० रोजी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांच्या हस्ते झाले. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी दीप प्रज्वलन करून लोकमत समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी एन्सारा मेट्रो पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठारी, संचालक दीपक वसंदानी, विक्री व विपणन प्रमुख मनोज असरानी, लोकमत मीडिया प्रा.लि.चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, परिचालन संचालक अशोक जैन, वरिष्ठ महाप्रबंधक नीलेश सिंह, सेवानिवृत्त तांत्रिक संचालक विंग कमांडर रमेश बोरा, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा, उत्पादन प्रमुख मतीन खान, उपमहाव्यवस्थापक (जाहिरात-उत्तर महाराष्ट्र) आसमान सेठ, ग्रुप इव्हेंट प्रमुख नितीन नौकरकर, आर्किटेक्ट दीपा जाकी, पुष्कर होम्सचे नीरज अग्रवाल, कृष्णा ग्रुपचे संजय बेले, ग्रीन स्पेस इन्फ्राचे राजेंद्र मांडविया, लेवरेज ग्रुपचे उमेश गुप्ता, पिरॅमिड ग्रुपचे प्रसाद तातावार प्रामुख्याने उपस्थित होते. विजय दर्डा आणि अन्य मान्यवरांनी शोमध्ये लावण्यात आलेल्या विविध प्रॉपर्टीच्या स्टॉलचे अवलोकन केले आणि विभिन्न प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. तीन दिवसीय प्रॉपर्टी शो सिव्हिल लाईन्स येथील लेडिज क्लबच्या हिरवळीवर सुरू आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळात सुरू राहील. प्रॉपर्टी शोमध्ये काढण्यात आलेल्या भाग्यशाली सोडतीत झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी संगीता जीवतोडे या विजेत्या ठरल्या. त्यांना एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सोडत दरदिवशी काढण्यात येणार आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
लोकमत प्रॉपर्टी शोचे थाटात उद्घाटन
By admin | Updated: October 11, 2014 02:48 IST