शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर आत्मा : मशीन तापमान मोजणार अन् तिकीटही तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 21:13 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अ‍ॅन्ड मॅनेजिंग अ­ॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय्यानेच प्रवाशाचे तापमान, त्याने मास्क घातला आहे की नाही आणि प्रवासाचे तिकीट तपासण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अ‍ॅन्ड मॅनेजिंग  अ‍ॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय्यानेच प्रवाशाचे तापमान, त्याने मास्क घातला आहे की नाही आणि प्रवासाचे तिकीट तपासण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आत्मा यंत्रणेचा शुभारंभ मेसर्स इजी स्ट्रीटच्या सहकार्याने करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या कंपनीशी करार केला आहे. यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवणे शक्य होणार आहे. या यंत्रणेत प्रवासी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर या मशीनच्या समोर उभा राहील. मशीनच्याा ह्युमन थर्मलशी संपर्क केल्यानंतर संबंधित प्रवाशाच्या शरीराचे तापमान मशीनद्वारे मोजण्यात येईल. त्यानंतर मशीनच फेस मास्क आहे की नाही आणि तिकिटाची तपासणीही दुरूनच करणार आहे. सर्व बाबी ठीक असल्यास बाजूला बसलेले रेल्वे कर्मचारी संबंधित प्रवाशास रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करण्याबाबत ध्वनिक्षेपकावरून सूचना देणार आहेत. या मशीनवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही लक्ष ठेवणार आहेत. रेल्वेस्थानकावर ऑटोमॅटिक विद्युत प्रवेशद्वारातून प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. आत्माच्या शुभारंभ प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थुल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते. अशा प्रकारच्या आणखी तीन मशीन रेल्वे प्रशासनाच्यावतीने लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या