शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद

By निशांत वानखेडे | Updated: January 16, 2024 19:00 IST

शेफ विष्णू मनोहर करणार अयोध्येतील श्रीराममंदिराला कढई अर्पण

नागपूर : अयोध्यात राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्त शेफ विष्णू मनोहर येत्या, २२ तारखेला श्री जगदंबा संस्थान कोराडी येथे ६ हजार किलोचा महाप्रसाद तर अयोध्येत २६ जानेवारीनंतर ७ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत. त्याकरीता जगातील सर्वात मोठी ‘हनुमान’ कढई तयार करण्यात आली आहे. ही कढई विष्णू मनोहर अयोध्येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहेत.

ही हनुमान कढई १५ हजार लिटर क्षमतेची असून १८०० किलो वजन व १५ फूट व्यासाची आहे. ही कढई तयार करण्यासाठी ६ मीमी जाडीचा स्टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्यात आला आहे. तो १० फूट आकाराचा आहे. दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्यामुळे ते उष्णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा २४ इंच रुंदीचा असून ३२ किलो वजनाचा आहे.ही कढई नागेंद्र विश्वकर्मा व त्यांचे वडील अनिरूद्ध विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. ही कढई घडवायला २० कारागीराची मदत घेण्यात आली. हे आव्हानात्मक कार्य करायला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला.

२२ जानेवारी अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना कोराडी येथील श्रीजगदंबा देवस्थानमध्ये ६ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा एक विश्वविक्रम ठरणार असून तो विष्णू मनोहर श्री जगदंबा संस्थान कोराडीच्या नावे समर्पित करणार आहेत. त्यानंतर ही ‘हनुमान’ कढई क्रेनच्या सहायाने मोठ्या ट्रेलरवर चढवून अयोध्येला रवाना केला जाईल. अयोध्येत पोहोचायला या कढईला दोन दिवस लागतील.

मी प्रभू श्रीरामांचा भक्त असून वयाच्या २२ व्या वर्षी ‘कार सेवा’ केली होती. आता अयोध्येत राममंदिर साकार होत असताना प्रभू श्रीरामाच्या चरणी ‘पाक सेवा’ देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाला ‘कार सेवा ते पाक सेवा’ असे नाव देण्यात आले आहे. ‘हनुमान’ कढई अयोध्येत पोहोचल्यानंतर येत्या, २६ जानेवारीनंतर तेथे ७ हजार किलो ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा देखील एक विश्वविक्रम ठरणार असून तो श्रीराम मंदिर न्यासच्या नावे नोंदवला जाईल. त्यानंतर ही ‘हनुमान’ कढई श्रीराम चरणी अर्पण केली जाणार आहे, असे ते विष्णू मनोहर म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरAyodhyaअयोध्या