शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

 नागपुरात  विनयभंग करणाऱ्या आरोपीला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 21:44 IST

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच, २००० रुपये दंड ठोठावून ती रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. हा खटला अवघ्या चार महिन्यात निकाली काढण्यात आला हे येथे उल्लेखनीय.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : चार महिन्यात दिला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच, २००० रुपये दंड ठोठावून ती रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. हा खटला अवघ्या चार महिन्यात निकाली काढण्यात आला हे येथे उल्लेखनीय.संदीप रामचंद्र पंधरे (२२) असे आरोपीचे नाव असून तो मोहगाव (जंगली), ता. सावनेर येथील रहिवासी आहे. १५ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास पीडित मुलगी महाविद्यालयातून घरी परतली. दुपारी २.३० च्या सुमारास ती स्रान करायला गेली. दरम्यान, तिला स्रानगृहाच्या दाराबाहेर कुणीतरी उभे असल्याचे दिसले. तिने दाराच्या खालून बाहेर पाहिले असता आरोपी तेथे उभा होता. त्यामुळे तिने आरडाओरड केली. तसेच, लगेच वस्त्र परिधान करून स्रानगृहाच्या बाहेर आली. ती घरात गेली असता आरोपी आधीच तेथे लपलेला होता. आरोपीने मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी पुन्हा ओरडली असता आरोपीने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मुलगी आरोपीच्या ताब्यातून सुटका करून बाहेर आली व घराचे दार बाहेरून बंद केले. आरोपी घरात होता. त्यानंतर मुलीने इतरांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, आरोपी खिडकी तोडून पळून गेला होता. मुलीच्या तक्रारीनंतर खापा पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंग