शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
3
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
4
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
5
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
6
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
7
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
8
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
9
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
10
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
11
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
12
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
13
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
14
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
15
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
16
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
17
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
18
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
19
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
20
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

मुंबईच्या पथकाचे सुपारी गोदामांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:04 IST

सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती नागरिकांना खाऊ घालणाºया आणि त्या माध्यमातून देशातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºयांची ....

ठळक मुद्देकोट्यवधींची सडकी सुपारी : नागपूर आणि मौद्याजवळ कारवाई, दलालांची धावपळ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती नागरिकांना खाऊ घालणाºया आणि त्या माध्यमातून देशातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºयांची डावबाजी सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूरच्या सुपारीबाजांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर, कळमना आणि मौद्याच्या जवळ असलेल्या गोदामावर मुंबईहून आलेल्या विशेष पथकांनी गुरुवारी सायंकाळी छापामार कारवाई केल्याची खास सूत्रांची माहिती आहे.विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे आजचीही कारवाई दडपण्यासाठी संबंधित दलालांनी रात्रीपर्यंत धावपळ चालवली होती. दुसरीकडे अशी कारवाईची चर्चा ऐकत असलो तरी कारवाई करणारी चमू कुठली आहे, त्याची आपल्याला माहिती नाही, असे एफडीएचे वरिष्ठ सांगत होते.ााणीत फेकलेली निकृष्ट सुपारी इंडोनेशियाहून कंटेनरने नागपुरात आणायची. तिच्यावर रासायनिक प्रक्रिया करायची आणि आरोग्यास घातक असलेली ही सुपारी खर्रा, सुगंधित पानमसाला, गुटखा आदीच्या माध्यमातून विकण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नागपुरात अशाप्रकारे रासायनिक प्रक्रिया केलेले घातक सुपारीचे अनेक ट्रक महाराष्ट्रातील विविध शहरांसह विविध राज्यात पाठविले जातात. अन्न व औषध विभागाच्या अधिकाºयांनी या गोरखधंद्यावर चाप बसविण्याचा प्रयत्न केला असता या विभागातील काही भ्रष्ट अधिकाºयांनीच घातक सुपारीचा धंदा करणाºयांना बचावाचा फंडा सांगून या विभागावर दडपण आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. लोकमतने वेळोवेळी या गोरखधंद्यावर प्रकाशझोत टाकला, हे विशेष!सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा धंदा करणारे काही व्यापारी आणि त्यांचे दलाल वेगवेगळ्या पद्धतीने आपली डावबाजी करीत असल्याचे आता संबंधित विभागाच्या वरिष्ठांच्या लक्षात आले आहे. नागपूर आणि शहराच्या आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणावर त्यांनी सडकी सुपारी लपवून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केल्याचे त्यांना कळले आहे. अशाच कळमन्यातील एका गोदामावर मुंबईहून आलेल्या आठ अधिकाºयांच्या चमूने गुरुवारी सायंकाळी कळमना आणि मौद्याच्या टोलनाक्याजवळच्या एका गोदामावर धडक दिल्याची माहिती आहे. बराच वेळ तेथे पाहणी केल्यानंतर अंधार पडल्यामुळे अधिकाºयांच्या या पथकाने संबंधितांना काही सूचना देऊन कारवाई तात्पुरती थांबविल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे कारवाईची दुपारीच कुणकुण लागल्यामुळे दलालांमार्फत काही जणांनी कोट्यवधींची सडकी सुपारी घाईगडबडीत शेतात फेकून दिल्याचे समजते.विशेष म्हणजे, लोकमतला ही माहिती कळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, अशा प्रकारची चर्चा आपण ऐकतो आहे. मात्र, कारवाई कुठली चमू करीत आहे, त्याची आपल्याला माहिती नाही. कुणाकडे कारवाई सुरू आहे, त्याचीही आपल्याला माहिती नसल्याचे केकरे म्हणाले.काय झाले चौकशी अहवालाचेविशेष असे की, दोन आठवड्यांपूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदामात प्रारंभी पोलिसांनी २ कोटी, ५४ लाखांची सडकी सुपारी असलेल्या गोदामावर छापा घातला होता. संबंधितांनी वाडी पोलिसांसोबत अर्थपूर्ण चर्चा केल्यामुळे आणि या चर्चेत एफडीएच्या किरण गेडाम नामक अधिकाºयानेही सहभाग नोंदवल्याने सुपारीची कारवाई दडपली गेली. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर एफडीएच्या वरिष्ठांनी त्याच गोदामावर चार दिवसानंतर पुन्हा छापा घालून तेथे अडीच कोटी रुपयांची सुपारी सील केली. यापूर्वी कारवाईच्या नावाखाली सुपारी खाल्ल्याचा संशय बळावल्याने वाडी पोलिसांची तसेच एफडीए तर्फे गेडामची चौकशी सुरू झाली. हा चौकशी अहवाल अद्याप वरिष्ठांपर्यंत पोहचला नाही. त्या संबंधाने विचारणा केली असता एफडीए आणि पोलीस अधिकारी ‘चौकशी सुरू आहे‘ असे मोघम उत्तर देतात.