शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वपूर्ण मुद्दा : मृत विवाहितेचा दावा बहीण पुढे चालवू शकते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 21:27 IST

अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे.

ठळक मुद्देकुटुंब न्यायालयाला द्यायचाय निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे. त्यावर ३१ मार्चपर्यंत निर्णय देण्याचा आदेश यवतमाळ कुटुंब न्यायालयाला देण्यात आला आहे.गोपाल धाबर्डे यांची विभक्त पत्नी ललिता यांनी कर्करोगावरील उपचारासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी व पुढील उपचाराकरिता आर्थिक मदत मिळण्याकरिता कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका प्रलंबित असताना २१ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अधिकृत वारसदार म्हणून ही याचिका पुढे चालविण्याची परवानगी मिळण्यासाठी ललिता यांची बहीण माया पाटील यांनी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कुटुंब न्यायालयाने १७ सप्टेंबर २०१६ रोजी तो अर्ज मंजूर केला. त्याविरुद्ध धाबर्डे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कायद्यानुसार पती हा पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्याविषयीच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होतो, असे त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीनंतर वरील मुद्दा निर्णयासाठी निश्चित केला. तसेच, पक्षकारांनी कुटुंब न्यायालयात हजर होऊन २९ फेब्रुवारीपर्यंत लेखी म्हणणे सादर करावे आणि कुटुंब न्यायालयाने या मुद्यावर ३१ मार्चपर्यंत निर्णय जारी करावा, असे आदेश दिले. याचिकेवर न्या. रवींद्र घुगे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFamilyपरिवारCourtन्यायालय