शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोशियारी समितीची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:16 IST

भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची पूर्णत: अंमलबजावणी करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यात सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. नागपुरात निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना दिले. निलंगेकर पाटील यांनी तातडीने निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या सूचना सचिवांना देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्दे निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा मोर्चा : मागण्यांच्या निवेदनाची कामगार मंत्र्यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची पूर्णत: अंमलबजावणी करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यात सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. नागपुरात निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना दिले. निलंगेकर पाटील यांनी तातडीने निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या सूचना सचिवांना देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.राज्य पावसाळी विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती नागपूरच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून मोर्चा निघाला. मोर्चाचे नेतृत्व समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे व राष्ट्रीय  महासचिव प्रकाश पाठक यांनी केले. ‘लोकमत’शी बोलताना पाठक म्हणाले, राज्यात १५ लाख निवृत्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वपूर्ण ३५ वर्षांची सेवा राज्याला दिली आहे. यामुळे वय झाले म्हणून राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ‘भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल’ पूर्णत: लागू करण्यासाठी प्रयत्न करावा, सोबतच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पेन्शन लागू करावी, ही आमची मागणी असल्याचे पाठक म्हणाले.मोर्चाचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे यासाठी मोर्चेकरी अडून बसल्याने काही वेळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना निवेदन देण्याची विनंती केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने निलंगेकर पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंत्र्यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील असल्याने तातडीने निवेदन पाठविले जाईल, सोबतच त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नागपूर शाखा अध्यक्ष श्याम देशमुख, भीमराव डोंगरे, पुंडलिक पांडे, अभिनंदन पळसापुरे, प्रभाकर खोेंड, प्रकाश दामले, महमद युनूस, अनिल कुसरे, अरुण कारमोरे, दिनेश वेखंडे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा