शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:06 IST

कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देतातडीने मदत पोहचवणे आवश्यक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे रस्त्यांवर हातठेले लावून चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, खाद्यपदार्थ, कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तू विकणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. मॉल्स व मोठ्या प्रतिष्ठानांमधील कामगार, हमाल, सुरक्षारक्षक व मालवाहू वाहनचालकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे कमी केल्यामुळे रिक्षाचालक, गटई कामगार, मेहंदी काढणारे आदींचा धंदा मंदावला आहे. अनेकांनी घरकामगारांची सेवा थांबवली आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार शहरातील अशा सुमारे ५० हजारांवर व्यक्तींना कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. परिस्थिती सुरळीत होतपर्यंत या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, सध्या या घटकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. तर असंतोष उफाळेलहातावर पोट असणाऱ्या घटकापर्यंत वेळेवर मदत पोहोचली नाही तर, त्यांच्यामध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास हा घटक स्वत:सह कुटुंबाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल व प्रशासनाला जुमानणे सोडून देईल. ती परिस्थिती ओढवू नये याकरिता सरकारने तातडीने मदत योजना जाहीर करणे योग्य होईल, असे बोलले जात आहे.कुणालाच चिंता नाहीहातावर पोट असणारा घटक सध्या सर्वाधिक अडचणीत आहे. त्या घटकाची कुणालाच चिंता नसल्याचे दिसून येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने या घटकाच्या मदतीसाठी तातडीने योजना जाहीर करावी. या घटकाला वाचविणे आवश्यक आहे. हरीश धुरट, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय कष्टकरी पंचायत.तात्काळ नियोजन करावेकोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईपर्यंत हातावर पोट असणाऱ्या घटकाला कसे जगवता येईल याचे सरकारने तात्काळ नियोजन करावे. या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यात असंतोष निर्माण होईल. विलास भोंगाडे, संयोजक, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल मूव्हमेंट्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर