शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावातच करा : आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 23:28 IST

घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.

ठळक मुद्देविसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. गणेश विसर्जन व्यवस्थेसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता मनोज तालेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राऊत, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, सहायक प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, राजेश रहाटे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.प्रारंभी आयुक्तांनी विसर्जनस्थळावर प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरात एकूण ३०० कृत्रिम तलाव ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. फुटाळा तलावावर आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था करा, गणेश विसर्जन दुसऱ्या दिवसापासूनच सुरू होते. त्यामुळे कृत्रिम तलावाची दररोजची संख्या किती याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विसर्जनस्थळी आवश्यक ते सूचना फलक , निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात यावे, कृत्रिम तलाव स्वच्छ करताना रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत करण्यात यावा. यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले.फुटाळ्यावरील कृत्रिम टाकीत ५०० च्या जवळपास मूर्तीचे विसर्जनगणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड आणि तीन दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू झाले आहे. फुटाळा तलावावर विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आल्या आहे. जास्तीत जास्त मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये करण्यासाठी ग्रीन व्हीजिल या पर्यावरणवादी संस्थेचे सदस्य दरवर्षीप्रमाणे तैनात झाले आहे. फुटाळ्यावरील वायुसेनानगरच्या भागातील जबाबदारी या संस्थेने सांभाळली असून, तलावात मूर्ती विसर्जित होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन दिवसात ५०० च्या जवळपास मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात झाल्याची माहिती ग्रीन व्हीजिलचे समन्वयक कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिली. बुधवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी फुटाळ्याला भेट देऊन आढावा घेतला. तलाव संवर्धनाच्या मोहिमेत ग्रीन व्हीजिलचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णूदेव यादव, वृषाली श्रीरंग, कार्तिकी कावळे, नम्रता झवेरी, हेमंत अमेसर, स्मिताली उके, अविनाश लहेवार, निधी बन्सल यांच्यासह कमला नेहरू महाविद्यालय, सेवादल महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहे.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर