शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हेरीटेज झिरो माईलसाठी तातडीने विशेष नियम निश्चित करा; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 11:52 IST

Zero Miles Nagpur News हेरीटेज झिरो माईलच्या संरक्षण व संवर्धनासाठी तातडीने विशेष नियम निश्चित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व नागपूर महानगरपालिका यांना दिला.

ठळक मुद्देविकास कामे करण्यास मनाई

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशामध्ये सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या हेरीटेज झिरो माईलच्या संरक्षण व संवर्धनासाठी तातडीने विशेष नियम निश्चित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व नागपूर महानगरपालिका यांना दिला. तसेच, तेव्हापर्यंत झिरो माईल परिसरात कोणतेही विकास कामे करण्यास मनाई केली.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. कार्तिक शुकुल यांनी हेरीटेज बिल्डिंग्ज संवर्धन नियमाच्या नियम ४ अनुसार हेरीटेजच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम निश्चित करणे अनिवार्य आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

झिरो माईलकरिता मनपा आयुक्तांनी हेरीटेज समितीशी सल्लामसलत करून विशेष नियम निश्चित करायला हवेत. नियमानुसार ही जबाबदारी मनपा आयक्तांची आहे व हेरीटेज समितीने त्यांना आवश्यक सूचना करायला पाहिजे. त्याशिवाय हेरीटेज परिसरात कोणत्याही प्रकारची विकास कामे करता येत नाही असेही त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने ही कायदेशीर तरतूद लक्षात घेता हा महत्वपूर्ण आदेश दिला.

गेल्यावर्षी नागपूरमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणची राष्ट्रीय परिषद झाली होती. त्या परिषदेसाठी देशभरातील सुमारे २०० न्यायाधीश नागपुरात आले होते. दरम्यान, अनेकांनी उत्सुकतेपोटी झिरो माईलला भेट दिली. तेथे गेल्यानंतर झिरो माईलची दूरवस्था पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे उच्च न्यायालयाने झिरो माईलच्या विकासाकरिता स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. याचिकेवर २३ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयZero Mileझीरो माईल