शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् तात्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:25 IST

फेसबुक,  ट्विटर  व यूट्यूब यावरील न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् तात्काळ हटवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : फेसबुक, ट्विटर , यूट्यूबला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेसबुक,  ट्विटर  व यूट्यूब यावरील न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् तात्काळ हटवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून त्यावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाविषयी अतिशय खालच्या भाषेत पोस्टस् टाकल्या जात होत्या. त्या पेजमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत होता. ही बाब निदर्शनास येतपर्यंत सुमारे तीन लाख फेसबुक युजर्सनी त्या पेजला भेट दिली होती. परिणामी, उच्च न्यायालयाने असे प्रकार थांबविण्यासाठी स्वत:च ही याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, केवळ फेसबुकच नाही तर,  ट्विटर व यूट्यूब यावरही न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् टाकल्या जात असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे, याचिकेत या सर्वांना प्रतिवादी करण्यात आले. नोटीस बजावण्यात आल्यानंतर या कंपन्या न्यायालयात हजर झाल्या. दरम्यान, मंगळवारी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना हा आदेश देण्यात आला. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून ते याचिकेचे कामकाज पहात आहेत.गुन्हेगारांवर कारवाई होईलसायबर गुन्हे विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून फेसबुक, ट्विटर, यूट्यूब यासह अन्य सोशल मीडियावर न्यायालयांचा अवमान करणाऱ्या पोस्टस् टाकणाऱ्या गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. परिणामी, विभागाच्या पुढील हालचालीकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSocial Mediaसोशल मीडिया