शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘मिक्सोपॅथी’ला आयएमएचा विरोध कायम - डॉ. आर.व्ही.असोकन 

By सुमेध वाघमार | Updated: April 22, 2024 21:17 IST

‘आयएमए’ नागपूर शाखेचा रविवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) कोणत्याही पॅथीला विरोध नाही. मात्र ‘मिक्सोपॅथी’ला विरोध कायम आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा अन्य पॅथीमध्ये प्राविण्य मिळविणाºया डॉक्टरांनी त्याच पॅथीमध्ये प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. परिणामी, ते रुग्णांना अधिक न्याय देऊ शकतात. त्यांनी अन्य शाखेच्या पॅथीत प्रॅक्टिस करण्यास आमचा विरोध आहे, असे स्पष्ट मत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा (आयएमए)  मुख्यालयाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी व्यक्त केले. 

  ‘आयएमए’ नागपूर शाखेचा रविवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, डॉ. दिनेश ठाकरे, आयएमएचे माजी राष्टीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी आयएमएच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. मंजुषा गिरी यांनी तर सचिवपदाची सूत्रे डॉ. प्राजक्ता कडूसकर यांनी हाती घेतली. विभागीय आयुक्त बिदरी यांनी समाजाच्या कल्याणासाठी आयएमएने सिकलसेल, अ‍ॅनिमियाची जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक लसीकरणासारखे प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. संचालन डॉ. अंजली भांडारकर व डॉ. दिशा मेथवानी यांनी केले. आभार डॉ. प्राजक्ता कडूसकर यांनी मानले.

-डॉक्टरांवरील हल्ल्यावर जलद कृती गट डॉ. गिरी म्हणाल्या, या वषार्ची थीम ‘आॅल फॉर हेल्थ अँड हीलिंग हँड्’ आहे. हॉस्पिटल नोंदणीचे नूतनीकरण, जैव-वैद्यकीय कचºयाचे व्यवस्थापन आदी समस्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. डॉक्टरांवरील भ्याड हल्ल्याच्या विरोधात आयएमए जलद गृती गट सक्रिय करणार आहे. यासोबतच किशोरवयीन आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी विशेष योजना आखल्या जाणार आहेत. विविध संस्थांना ‘सीओएलएस’ व ‘सीपीआर’चे  प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘आओ गाव चले’ प्रकल्प नाविन्यपूर्ण मार्गाने राबविले जाणार आहे. 

-अशी आहे नवीन कार्यकारणी  अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, सचिव डॉ. प्राजक्ता कडूसकर, निर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, उपाध्यक्ष डॉ. समीर जहागिरदार व डॉ. सुषमा ठाकरे, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश गहुकर, सहसचिव डॉ. जितेंद्र साहू व डॉ. विरल शहा, आयएमए एएमएसच्या अध्यक्ष डॉ अंजली भांडारकर, सचिव डॉ. आदित्य परिहार, सहायक अभ्यास संचालक डॉ. नितीन गुप्ता व सचिव डॉ. रामविलास मालाणी आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टर