शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातही ‘आयएमए’चा आज काळा दिवस : ६५० इस्पितळांची ओपीडी राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 20:13 IST

‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, असे असताना केंद्र सरकार ‘एनएमसी’ विधेयक आणायच्या तयारीत आहे. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे, याला विरोध म्हणून मंगळवार २ जानेवारी रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखा काळा दिवस पाळणार आहे.

ठळक मुद्देनॅशनल मेडिकल कमिशनला विरोध

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, असे असताना केंद्र सरकार ‘एनएमसी’ विधेयक आणायच्या तयारीत आहे. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे, याला विरोध म्हणून मंगळवार २ जानेवारी रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखा काळा दिवस पाळणार आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवणार आहे, अशी माहिती ‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत यांनी पत्रपरिषदेत दिली.पत्रपरिषदेला  महाराष्ट्र  आयएमएचे डॉ. वाय. एस. देशपांडे, नागपूर आयएमए सचिव डॉ. प्रशांत राठी, डॉ. अशोक अढाव उपस्थित होते.डॉ. प्रकाश देव म्हणाले, केंद्र सरकारने ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’(एमसीआय)ऐवजी ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ‘एमसीआय’ विधेयकात एमबीबीएसच्या ६० टक्के जागा या शासनाकडून तर ४० टक्के जागा खासगीमधून भरल्या जात होत्या. परंतु ‘एनएमसी’ विधेयकात शासन ४० पर्यंत जागा भरू शकेल, असे नमूद आहे. नेमक्या किती जागा, याबाबत संभ्रम आहे; शिवाय ६० टक्के जागा खासगी महाविद्यालये भरणार असल्याने शुल्काला घेऊन लूट होईल. यात गरीब व सामान्यांची मुले मागे पडतील. वैद्यकीय शिक्षण श्रीमंताचे होईल. भ्रष्टाचारात वाढ होईल. ‘क्रॉसपॅथी’मुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येईल.मर्जीतील इस्पितळांना कमी दंडडॉ. देव म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्यास ५ ते १०० कोटी रुपयांपर्यंतचा दंड लावण्याची मुभा ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला देण्यात आली आहे. यामुळे कमिटीचे सदस्य मर्जीतील इस्पितळांना कमी दंड तर दुसऱ्याला जास्त दंड लावू शकतात.भ्रष्टाचार वाढण्याची भीतीडॉ. अढाव म्हणाले, ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ हे सरकारतर्फे चालवले जाईल आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढेल. प्रस्तावित कायद्यामुळे अडचणी वाढतील. भ्रष्टाचार वाढेल. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे सरकारच्या हातातील बाहुले बनेल, असा आरोपही त्यांनी केला.केवळ आकस्मिक सेवा सुरू राहीलडॉ. देशपांडे म्हणाले, प्रस्तावित विधेयकाला घेऊन आयएमए मंगळवारी काळा दिवस पाळत आहे. नागपुरातील सुमारे ६५० इस्पितळांची ओपीडी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील. परंतु गंभीर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आकस्मिक विभाग सुरू राहील.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप