सुन रहा है ना तू...रो रहा हूँ मैं : मोरांच्या डोळ्यातून गळणारी आसवे पिऊन लांडोर गरोदर राहते आणि मोर हा सनातन ब्रह्मचर्य पाळणारा प्राणी आहे हा राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या.महेशचंद्र शर्मा यांनी केलेला अफलातून दावा पेंच राष्ट्रीय उद्यानातील या मोराने मात्र फोल ठरविला आहे. लांडोरीपुढे प्रेमाच्या आणाभाका घालणाऱ्या या मोराने तिला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी असा सुंदर पिसारा फुलविला तेव्हा या अत्यंत देखण्या अशा प्राण्याच्या मनमोहक अदेवर पर्यटकही फिदा झाले नाही तरच नवल! हा सुंदर क्षण टिपलाय ऐश्वर्या हरकरे यांनी.
सुन रहा है ना तू...रो रहा हूँ मैं :
By admin | Updated: June 4, 2017 02:01 IST