शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनपा शाळेच्या इमारतीवर अवैधरीत्या बांधले सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:48 IST

लोटस कल्चरल अ‍ॅन्ड स्पोर्टिंग असोसिएशनने नमकगंज (मस्कासाथ) येथील महापालिका शाळेच्या जुन्या इमारतीवर अवैधरीत्या सामाजिक सभागृह बांधल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सभागृह बांधताना आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नाहीत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहायकोर्टातील याचिकेत आरोप : राज्य सरकार, मनपाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : लोटस कल्चरल अ‍ॅन्ड स्पोर्टिंग असोसिएशनने नमकगंज (मस्कासाथ) येथील महापालिका शाळेच्या जुन्या इमारतीवर अवैधरीत्या सामाजिक सभागृह बांधल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सभागृह बांधताना आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नाहीत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.भोला बैसवारे, रवींद्र पैगवार व हसमुख सगलानी अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. हे प्रकरण बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणीसाठी लागले होते. दरम्यान, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी २० हजार रुपये प्रबंधक कार्यालयात जमा करण्यास सांगितले व त्या अटीवर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मनपा नगर रचना विभागाचे सहायक संचालक आणि लोटस कल्चरल अ‍ॅन्ड स्पोर्टिंग असोसिएशन यांना नोटीस बजावून १० आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.आधी संबंधित इमारतीत मनपाची दाजी मराठी प्राथमिक शाळा कार्यरत होती. ती शाळा बंद करून ही इमारत लोटस कल्चरल अ‍ॅन्ड स्पोर्टिंग असोसिएशनच्या नित्यानंद हिंदी कन्या शाळेसाठी केवळ मासिक ३,५०० रुपयांत भाड्याने देण्यात आली. ही इमारत फार जुनी आहे. असे असताना संघटनेने २०१७ मध्ये इमारतीच्या गच्चीवर सामाजिक सभागृह बांधले. या सभागृहासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्यात आले. सभागृहाचे बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.मनपाच्या शाळा भाड्याच्या इमारतीतयाचिकाकर्त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत मनपाच्या ३४ शाळा भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. त्या इमारतींचे महिन्याला लाखो रुपये भाडे दिले जात आहे. दुसरीकडे मनपाने स्वत:च्या २४ इमारती नाममात्र दराने दुसऱ्या संस्थांना भाड्याने दिल्या आहेत. मनपाचा असा उफराटा कारभार सुरू आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा