शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यात वाढले अवैध व्हेंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST

नागपूर : रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली आहे. कुठलाही परवाना नसताना हे अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्यामुळे ...

नागपूर : रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली आहे. कुठलाही परवाना नसताना हे अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने पाच अवैध व्हेंडरला अटक केली.

रेल्वे प्रशासनाने अधिकृत परवाना दिल्याशिवाय रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करणे रेल्वे अ‍ॅक्ट १४४ नुसार गुन्हा आहे. तरीसुद्धा अनेक अवैध व्हेंडर रेल्वे नियमाकडे दुर्लक्ष करून रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करतात. रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाडी क्रमांक ०२०९४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेसमध्ये पांढुर्णा ते नागपूर दरम्यान चणे, केळी आणि संत्रा विकत असलेल्या पाच अवैध व्हेंडरला अटक केली. सुरेश बलदेव सिंग (३४) रा. न्यू इंदोरा, राजेंद्र गुलाब मानकर (४४), रूपेश शंकर मस्के (३२) दोघेही रा. संत रविदास वॉर्ड पांढुर्णा, बालेश्वर मारोतराव तायवाडे (२८) रा. तिगाव ता. पांढुर्णा आणि रेवनाथ भाऊराव गोंडे (३३) रा. वसई वॉर्ड पांढुर्णा अशी अवैध व्हेंडरची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

...............