शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची लाखोंची अवैध उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 10:39 IST

राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देलगतच्या राज्यातून आवकअन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभाग नागपुरात कारवाईच्या नावाखाली आठवड्यात एक वा दोन प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर धाडी टाकतात. राज्यात प्रतिबंधित तंबाखूची निर्मिती होत नसली तरीही लगतच्या राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे.

दररोज खऱ्याचा लाखोंचा व्यवसायनागपुरातील टोल नाके बंद झाल्यामुळे वाहतुकीवर प्रतिबंध नाही. शिवाय जीएसटींतर्गत ई-वे बिल नसलेल्यांवर दररोज कारवाई होत नाही. त्यामुळे बिनादिक्कत तंबाखू मोठ्या प्रमाणात नागपुरात येतो आणि विशिष्ट विक्रेत्यांच्या माध्यमातून पानटपऱ्यांवर वितरित होतो. नागपुरात तीन हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्या सुरू असून त्यावर सुगंधित तंबाखूयुक्त खर्राच्या सर्रास विक्री होत असल्याचे लोकमतने प्रतिनिधीला पाहणीदरम्यान दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय असो वा विभागीय कार्यालय सर्वच शासकीय कार्यालयांच्या परिसरात खर्रा सर्रास विकला जातो. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठेत रात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या पानटपऱ्यांवर सुगंधित तंबाखू टाकून पानांची विक्री करण्यात येते. या ठिकाणी सर्वच ब्रॅण्डचा तंबाखू ग्राहकांना सहज उपलब्ध मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई करावीविभागाने पानटपऱ्यांऐवजी लाखो रुपयांच्या तंबाखूचा साठा करून विक्री करणाऱ्या मोठ्या विक्रेत्यांवर धाडी टाकाव्यात. तंबाखू वितरणाचे मोठे स्रोत बंद करावेत. त्यामुळे पानटपरी चालकांना तंबाखूच मिळणार नाही. कमी स्टाफ असण्याच्या कारणांवरून अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाबाहेर निघतच नाही. शिवाय माहितीच्या आधारे बाहेर पडले तर पानटपºयांवर कारवाई करून मोकळे होतात. ही विभागाची नित्याचीच बाब असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पानटपरीचालकांना धाक नाहीविभागातर्फे नियमित कारवाया होत नसल्यामुळे प्रतिबंधित तंबाखूयुक्त खऱ्याची विक्री करणाऱ्या पानटपरीचालकांना अधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही. कारवाईची माहिती होताच चालक टपरी बंद करतो. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर मुख्यत्वे युवकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या टपरीचालकांकडून हजारांनी दंड वसूल करण्याची गरज आहे, तरच तंबाखूच्या विक्रीवर काही प्रमाणात आळा बसेल. पावसाळी अधिवेशन काळात विभागाने टपरीला सील लावण्याच्या कठोर कारवाईनंतर पानटपरी चालकांमध्ये दहशत पसरली होती. अनेकांनी पानटपऱ्या बऱ्याच दिवसांपर्यंत उघडल्या नाहीत. कारवाईनंतर थोडासा दंड आकारण्यापलीकडे विभाग काहीही करीत नसल्यामुळे पानटपरीचालकांमध्ये विभागाचा धाक उरला नसल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले.

धाडीची कारवाई निरंतर प्रक्रियाविभागाच्या वतीने प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर निरंतर कारवाई करण्यात येते. धाडीची कारवाई ही विभागाची निरंतर प्रक्रिया आहे. पानटपऱ्यांना सील लावण्याच्या कारवाईनंतर चालकांमध्ये धडकी भरली होती. नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर आता धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.- शशिकांत केकरे, सहआयुक्त (अन्न)अन्न व औषधी प्रशासन विभाग.

टॅग्स :Healthआरोग्य