शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा परिवहन सभापतीच्या नावावर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:29 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाने शहर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यापासून दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सोमवारी निदर्शनास आला. परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या नावावर वसुली करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले. त्याला महापालिका मुख्यालयात आणून सभापतीसमोर उभे करण्यात आले. परंतु संशयित व्यक्ती बंटी कुकडे यांना ओळखू शकली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.

ठळक मुद्देसंशयित ताब्यात : पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाने शहर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यापासून दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सोमवारी निदर्शनास आला. परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या नावावर वसुली करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले. त्याला महापालिका मुख्यालयात आणून सभापतीसमोर उभे करण्यात आले. परंतु संशयित व्यक्ती बंटी कुकडे यांना ओळखू शकली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास महापालिका मुख्यालयातील परिवहन समितीच्या कक्षात बंटी कुकडे विविध विषयांवर चर्चा करीत असताना काही नागरिकांनी एका व्यक्तीला कुकडे यांच्या कक्षात आणले. कुकडे यांच्यापुढे उभे करून तुम्ही सभापतींना ओळखता का, असा सावल केला. परंतु यावर ती व्यक्ती काहीही बोलत नाही. बोलत नसल्याने नागरिकांनी त्याला चांगलेच फटकारले. हा काय प्रकार आहे. याची माहिती घेण्यासाठी कुकडे पुढे आले असता, संशयित व्यक्ती त्यांच्या नावावर तिकीट चेकर असल्याचे सांगून वसुली करीत असल्याचे निदर्शनास आणले. याचा व्हिडिओ तयार केल्याची माहिती मिळाली. कुकडे यांनी संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता, त्याचे नाव सुभाष ढोके असल्याचे सांगितले.मेडिकल महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या वंजारीनगर परिसरात राहत असल्याची माहिती त्याने दिली. पैसे नसल्याने बसमध्ये चढलो व तुमचे नाव सांगितले. वसुली केली नाही. त्याने खिशातील पाकिटही दाखविले. त्यात काही सुटे पैसे असल्याचे आढळून आले. अजनी येथून एका बसमध्ये ढोके यांना पकडले होते. त्याला आणणाºयापैकी एक जण परिवहन विभागाचा माजी कर्मचारी होता. ढोके याच्या नावावर ही व्यक्ती नेहमी वसुली करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, कु कडे यांनी परिवहन विभागातील कर्मचाºयांना संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देऊन तक्रार करण्याची सूचना केली.प्रकरणाची चौकशी करणारप्रकरण संशयास्पद आहे. एखादी व्यक्ती माझ्या नावावर वसुली करीत असेल तर योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी करू. यामुळेच पोलिसात तक्रार करण्याची सूचना केली आहे. पोलीस तपासात या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.बंटी कुकडे, सभापती परिवहन समिती

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर