शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध मद्यविक्री : राज्य उत्पादनशुल्क खात्याकडून नऊ महिन्यांत अठराशेहून अधिक गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:53 IST

मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्देकारवाईचा वेग वाढला : महसुलाच्या उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे विचारणा केली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात गोळा झालेला महसूल, एकूण उद्दिष्ट तसेच अवैध मद्यविक्रीविरोधात झालेली कारवाई तसेच संबंधित बाबींसंदर्भात माहिती विचारण्यात आली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१६-१७ मध्ये अवैध मद्यविक्रीसाठी २ हजार २१ गुन्हे दाखल झाले होते व १ हजार १९५ आरोपींना अटक झाली होती. तर २०१७-१८ मध्ये २ हजार ३४१ गुन्हे दाखल झाले व १ हजार ७५६ जणांना अटक झाली. २०१८-१९ च्या पहिल्या नऊ महिन्यांतच विविध प्रकारचे १ हजार ८१६ गुन्हे दाखल झाले व १ हजार ५३६ आरोपींना अटक करण्यात आली. कारवायांमध्ये ९८ वाहने तर १ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमालदेखील जप्त झाला. यात हातभट्टी, विविध रसायने, देशी दारू, विदेशी मद्य, बनावट स्पिरीट, परराज्यातून येणारे विदेशी मद्य, मोहफुलाची दारू, ताडी इत्यादींचा समावेश आहे.नऊ महिन्यांत ४० टक्के महसूल जमामागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या महसुलाचे उद्दिष्ट वाढले आहे. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत उत्पादन शुल्क खात्याने ७५३ कोटी १८ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्यक्षात ३०३ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ही रक्कम अवघी ४०.२८ टक्के इतकी होती. वर्षभरातील सर्वाधिक महसूल हा मार्च महिन्यात जमा होतो. त्यामुळे ही फरकाची आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे.मागील वर्षी अधिक महसूलप्राप्ती२०१६-१७ मध्ये नागपूर जिल्ह्यात ७७७ कोटी ११ लाखांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५२१ कोटी ५० लाख (६७.११ टक्के) उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. २०१७-१८ मध्ये विभागाची कामगिरी फारच चांगली राहिली होती. त्या वर्षी ६०८ कोटी ५९ लाखांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ६६० कोटी ५३ लाखांचा महसूल जमा झाला होता. उद्दिष्टाच्या तुलनेत हा आकडा १०८.५३ टक्के इतका होता.

 

 

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी