लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलिसांनी कन्हान (ता. पारशविनी) शहरालगतच्या मरगट्टी खाण क्रमांक-३ भागात धाड टाकून अवैध दारूविक्रेत्यास अटक केली. त्याच्याकडून देशी दारू व दाेन माेटरसायकली असा एकूण १ लाख ११ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ५) दुपारी करण्यात आली.
साेनू रामविला सिंग (२४, रा. मरगट्टी खाण क्रमांक-३, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या अवैध दारूविक्रेत्याचे नाव आहे. साेनू या भागात अवैधरीत्या दारूविक्री करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी त्याच्या घरी धाड टाकून झडती घेतली. यात त्याच्या घरी देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पाेलिसांनी दारूच्या बाटल्या, त्या दारूच्या विक्रीतून मिळालेली रक्कम व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दाेन माेटरसायकली जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ११ हजार ४६० रुपये असल्याची माहिती सहायक पाेलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांनी दिली. ही कारवाई परीविक्षाधीन पाेलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, सहायक पाेलीस निरीक्षक सतीश मेश्राम, अमितकुमार आत्राम, संजय बराेदिया आतिश मानवटकर, शरद गीते, सुधीर चव्हाण यांच्या पथकाने केली.