शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिंग्ज ; नागपुरात ४६ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:02 IST

शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंगची भरमार आहे. गेल्या वर्षभरात १९५१ अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटवून पोलिसात ४६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१.९१ लाखाचा दंड वसूल : दोन हजार होर्डिंग्ज हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंगची भरमार आहे. गेल्या वर्षभरात १९५१ अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटवून पोलिसात ४६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग आणि बॅनर लागल्याचे चित्र आहे़ यामुळे शहर विद्रूप होत आहे़ यासंदर्भात एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती़ न्यायालयाने अवैध होर्डिंग्जची यादी सादर करण्याचे आदेश याचिकाकर्ता आणिमहापालिकेला दिले. अवैध होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स लावणारे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, जाहिरात एजन्सीज, शुभेच्छा देणारे फलक अशा सर्वांच्या नावाची यादी सादर करावी आणि संबंधित राजकीय पक्ष, एजन्सीज यांच्या नावांची यादी मिळाल्यानंतर त्यांना अवमानना प्रकरणात प्रतिवादी करावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते़ दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने होर्डिंग, प्लेक्स, बॅनर हटविण्याची प्रक्रिया सुरू केली़ गेल्या वर्षात १० झोनमध्ये ४६ गुन्हे दाखल करण्यात आले़ यात सर्वाधिक प्रकरणे मंगळवारी झोनमधील आहेत़अवैध होर्डिंग लावणाऱ्यांवर १०० रुपये प्रति दिवस यानुसार दंड आकारणी केली जाते़ अवैध होर्डिंग विरोधात कारवाई करण्याची जबाबदारी झोनमधील अधिकाऱ्यांना सोपविण्यात आली आहे़ मात्र झोनमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे ती जबाबदारी आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे आता देण्यात आली़ वर्षभरात अवैध होर्डिंग लावणाऱ्यांकडून १ लाख ९१ हजार ९७० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला़ २० चौरस फुटाहून मोठे होर्डिंग लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.मेट्रोमुळे मनपाचे उत्पन्न बुडालेशहरात प्रमुख रस्त्यावर मोठमोठे होर्डिंग लावलेले असतात़ शुल्क आकारून महापालिका मोठे होर्डिंग लावण्यास परवानगी देते़ मात्र, मेट्रो रेल्वेच्या कामामुळे जाहिरात विभागाचे उत्पन्न बुडत आहे. एकट्या वर्धा रोडवर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या होर्डिंगच्या माध्यमातून मिळणारे ६० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर