शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍याच्या शेतातील सागाची अवैध कटाई!

By admin | Updated: May 3, 2014 16:49 IST

वन अधिकार्‍यांच्या मर्जीने एका ठेकेदाराने शेतकर्‍याच्या शेतातील सागाच्या झाडांची अवैध कटाई केल्याची घटना पुढे आली आहे. असे असताना, अख्खा वन विभाग मात्र गत चार महिन्यांपासून गप्प बसला आहे.

लोकमत विशेष दोषी अधिकारी मोकाट : शेतकर्‍यांची न्यायासाठी वणवणजीवन रामावत नागपूर : वन अधिकार्‍यांच्या मर्जीने एका ठेकेदाराने शेतकर्‍याच्या शेतातील सागाच्या झाडांची अवैध कटाई केल्याची घटना पुढे आली आहे. असे असताना, अख्खा वन विभाग मात्र गत चार महिन्यांपासून गप्प बसला आहे. अमोल हेमंतराव हिवसे रा. सबकुंड ता. काटोल असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे. या शेतकर्‍याची मौजा कोकारडा (रिठी) येथे सर्वे क्र. १४२ ही शेती आहे. शिवाय त्यांच्याशेजारी जानराव नथ्थूजी हिवसे यांच्या मालकीचे सर्वे क्र. १४१ हे शेत आहे. माहिती सूत्रानुसार जानराव हिवसे यांनी त्यांच्या शेतातील काही सागाची झाडे हिरुळकर नावाच्या एका ठेकेदाराला विकली होती. त्यानुसार ती झाडे तोडण्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागण्यात आली. त्यावर वन विभागाचे क्षेत्र सहायक आर. जे. डाखोळे यांनी मौका पंचनामा करून झाडे तोडण्याची परवानगी दिली. परंतु ठेकेदाराने जानराव हिवसे यांच्या शेतातील झाडांसह शेजारच्या अमोल हिवसे यांच्या शेतातील २७, ३६, ५२, व ५४ क्रमांकाच्या चार सागवनाच्या झाडांची अवैध कटाई केली. सोबतच त्या झाडांच्या वाहतुकीसाठी रहदारी परवान्यासाठी वन विभागाकडे अर्ज करण्यात आला. त्यावर संबंधित वन अधिकार्‍यांनी पुन्हा मौका पंचनामा करून,जानराव हिवसे यांच्या शेतातील झाडांसोबतच अमोल हिवसे यांच्या शेतातील झाडांवरही आयव्ही ३६८ क्रमांकाचा हँमर मारून वाहतूक परवाना जारी केला. परंतु अमोल हिवसे यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी लगेच संबंधित वन अधिकार्‍यांकडे तक्रार करून त्यावर आक्षेप घेतला. परंतु त्यांच्या त्या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे अमोल हिवसे यांनी सहायक वनसंरक्षक जे. बी. चोपकर यांच्यासह उपवनसंरक्षक पी. के. महाजन, नागपूर सर्कलचे मुख्य वनसंरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षकांपर्यंत धाव घेतली. पण गत चार महिन्यांपासून त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही.