लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : नागपूर जिल्ह्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना चिरव्हा (ता. माैदा) लगतच्या कन्हान नदीवरील वळणा घाटात राेज शेकडाे ब्रास रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. अवैध रेती उपसा करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांच्या हस्तकांची संख्या अधिक आहे. या रेती चाेरीमुळे राज्य शासनाला लाखाे रुपयांच्या महसुलावर पाणी फेरावे लागत आहे. ही रेतीचाेरी महसूल व पाेलीस विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांना माहीत असून कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नाही.
या घाटात दिवसभर मजुरांकरवी रेतीचा उपसा केला जात असून, रात्रभर पाेकलॅण्ड व जेसीबी मशीनद्वारे उपसा केला जाताे. घाटातील रेती पहिल्यांदा ट्रॅक्टरच्या ट्राॅलीने परिसरातील शेतात नेऊन तिथे साठवली जाते. ती रेती साठवून ठेवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना रेती तस्करांकडून पैसेही दिले जातात. त्यानंतर शेतातील रेती मागणीप्रमाणे नागपूर व इतर शहरांमध्ये माैदामार्गे पाठविली जाते. माेठ्या शहरात नेल्या जाणाऱ्या रेतीची वाहतूक मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू असते.
रेतीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे वळणा घाट परिसरातील गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांसाेबतच पांदण रस्त्यांची दैनावस्था झाली असून, ते पायी चालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. खड्ड्यांमुळे अपघात हाेत असल्याने तसेच वाहनांचे नुकसान हाेत असल्याने या भागातील शेतकऱ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. या रेतीचाेरीत माैदा तालुक्यातील काही राजकीय नेते, पक्षाचे पदाधिकारी व त्यांचे हस्तक गुंतले असल्याने महसूल व पाेलीस विभागातील अधिकारी त्यांच्याविरुद्ध ठाेस कारवाई करण्याची हिंमत करीत नाही.
....
रेती वाहतुकीचा मार्ग
वळणा घाटातील उपसा केलेली रेती याच भागातील काही शेतात साठवून ठेवली जाते. ती रेती पुढे ट्रक व टिप्परद्वारे चिरव्हा, माराेडी, नवेगाव व कुराड मार्गे माैदा व माैद्याहून नागपूरला तसेच माेहखेडी व पावडदाैना मार्गे माैदा व माैद्याहून नागपूर तसेच अन्य ठिकाणी विक्रीसाठी नेली जाते. रेतीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे चिरव्हा, माराेडी, नवेगाव , माेहखेडी, कुराड पावडदाैना परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे.
....
हस्तकांची दादागिरी
रेतीघाट व परिसरात रेतीतस्करांसाेबतच त्यांचे हस्तकही दादागिरी करतात. नीलेश शंकर हिरेखन हे काही दिवसांपूर्वी वळणा घाटात गेले असता, तिथे त्यांना रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याचे दिसले. त्यांनी याउपशाचे माेबाईमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर रेतीतस्करांच्या हस्तकांनी आक्षेप घेत त्यांचा माेबाईल , सात हजार रुपये राेख व आधार कार्ड हिसकावून घेतले. याबाबत नीलेश हिरेखन यांनी माैदा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेच्यावेळी त्यांच्यासाेबत महसूल विभागाचे दाेन कर्मचारी उपस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले.