शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आयएफसीसीआय इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:43 IST

द इंडो-फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (आयएफआयआयसी) वतीने आणि फ्रान्स दूतावासाच्या सहकार्याने इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन २ नोव्हेंबरला वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये होणार आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत एच. ई. अ‍ॅलेक्झॅन्डर झिगलर यांच्या नेतृत्वात ११२ इंडो-फ्रान्स कंपन्यांचे उच्चस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कॉन्क्लेव्हचे मुख्य संयोजक प्रसन्ना मोहिले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे२ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय आयोजन : सामंजस्य करार होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : द इंडो-फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (आयएफआयआयसी) वतीने आणि फ्रान्स दूतावासाच्या सहकार्याने इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन २ नोव्हेंबरला वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये होणार आहे. भारतातीलफ्रान्सचे राजदूत एच. ई. अ‍ॅलेक्झॅन्डर झिगलर यांच्या नेतृत्वात ११२ इंडो-फ्रान्स कंपन्यांचे उच्चस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कॉन्क्लेव्हचे मुख्य संयोजक प्रसन्ना मोहिले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आणि वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते.मोहिले म्हणाले, स्मार्ट मोबिलिटी, लॉजिस्टिक, एरोस्पेस हे मुख्य मुद्दे आहेत. इंडो-फ्रान्सचे ११२ कंपन्यांचे ११२ प्रतिनिधी मिहानचा पूर्ण अभ्यास करून येत आहेत. सर्व प्रतिनिधी मिहानमधील पायाभूत सुविधांची पाहणी करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात सामंजस्य करार होणार आहेत. समूह चर्चा आणि समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आयएफसीसीआयचे अध्यक्ष गुलयुमी जिरार्ड रेडेट प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. नागपूरसह विदर्भ गुंतवणुकीसाठी योग्य ठिकाण असल्याची जाणीव सर्व प्रतिनिधींना करून देण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मोबिलिटी, लॉजिस्टिक, एरोस्पेस व डिफेन्स या विषयांवर भारत सलोहोत्रा, स्टीफन्स लॅविग्ने, पॅट्रिक गिलार्ड, प्रमोद पुराणिक, ले. जनरल रवींद्र थोडगे, यूगो विन्सेंट, कॅ. राम अय्यर, वैभव व्होरा, संदीप चौधरी, उल्हास मोहिले मार्गदर्शन करणार आहेत.मोहिले म्हणाले, विदर्भातील मुले-मुली उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुणे व इतरत्र जातात. नागपुरात चांगल्या कंपन्या आल्यास ही मुले बाहेर जाणार नाहीत. नागपूरसह विदर्भात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा, या उद्देशाने गेल्या दीड वर्षांपासून नागपुरात असा मोठा कार्यक्रम व्हावा आणि विदेशी कंपन्यांनी नागपुरात गुंतवणूक करावी, याकरिता वैयक्तिक पातळीवर आणि चेंबरशी वारंवार चर्चा करून प्रयत्न सुरू होते. त्याचे फळ मिळाले आहे. फडणवीस आणि गडकरी यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्वसनीयतेमुळे उद्योजक नागपुरात यायला तयार झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळेल, असा विश्वास उद्योजकांमध्ये निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Franceफ्रान्सIndiaभारत