शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोच मिळाल्यास दररोज धावणार दुरांतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:44 IST

नागपूर-मुंबई दरम्यान दररोज धावणारी दुरांतो एक्स्प्रेस आता एक दिवसाआड चालण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता ...

ठळक मुद्देबृजेशकुमार गुप्ता यांची माहिती : बंगल्याऐवजी गँगमनने करावी ‘फिल्ड ड्युटी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-मुंबई दरम्यान दररोज धावणारी दुरांतो एक्स्प्रेस आता एक दिवसाआड चालण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव-वासिंद दरम्यान अपघातग्रस्त झाल्यामुळे या गाडीचे नऊ कोच नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे दोनपैकी केवळ एकच रेल्वेगाडी सध्या उपलब्ध आहे. दुरांतो एक्स्प्रेसचे कोच विशेष प्रकारचे असल्यामुळे त्याचा मध्य रेल्वेत तुटवडा आहे. त्यामुळे इतर रेल्वेतून कोचेसची व्यवस्था करण्यात येत आहे. या कोचेसची व्यवस्था होईपर्यंत ही गाडी एक दिवसआड चालविण्यात येणार आहे. याबाबत मुंबई येथील झोन मुख्यालय निर्णय घेणार असून निर्णय होताच त्याची माहिती प्रवाशांना देण्यात येईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.मध्य रेल्वे नागपूर विभागात १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’, पंधरवड्यानिमित्त ‘डीआरएम’कार्यालयाच्या सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विभागातील सर्व अधिकाºयांना त्यांच्या बंगल्यावर गँगमनकडून काम करून घेणे बंद करण्याची ताकीद दिली. गँगमनने बंगल्याऐवजी फिल्ड ड्युटी करण्याची सूचना त्यांनी दिली. प्रशासन याबाबत गंभीर असून ज्याची ड्युटी जेथे आहे तेथे तो काम करताना दिसला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता परिवेश शाहु, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते.रेल्वे फ्रॅक्चरची आधीच होती माहितीनागपूर रेल्वेस्थानकावर नुकत्याच तुटलेल्या रेल्वे रुळावरून गेलेली संपर्कक्रांती एक्स्प्रेस थोडक्यात बचावल्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता डीआरएम गुप्ता म्हणाले, रेल्वेस्थानकावर रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम सुरु होते. संबंधित तुटलेल्या रेल्वे रुळाच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. त्यात सुधारणा होणार तेवढ्यात हा रुळ तुटला. खतौली येथील उत्कल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, विभागात रेल्वे रुळांची सातत्याने देखभाल करण्यात येत आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सावधानी बाळगण्यात येत आहे.पंधरवड्यात २१४ प्रवाशांवर कारवाई‘डीआरएम’ गुप्ता म्हणाले की, स्वच्छता पंधरवड्यात रेल्वे परिसर, स्टेशन, रेल्वेगाडी, पेंट्रीकार, बेसकिचन, शौचालय, कार्यालय आदी परिसरात स्वच्छतेबाबत निरीक्षण करून सुधारणा घडविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंधरवड्यात घाण पसरविणाºया २१४ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २१४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. २५ रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमधील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. यातील काही गाड्यात कमतरता आढळली असून ती दूर करण्यासाठी निर्देश देण्यात आले. खाद्यपदार्थांच्या तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. ते म्हणाले की, पेंट्रीकारतर्फे अधिक किंमत वसूल करण्याच्या प्रकरणात मोठा दंड वसूल करण्यासाठी रेल्वे बोर्ड भर देत आहे.जानेवारीपर्यंत मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीअजनीत आठ टन क्षमतेची मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित कंत्राटदाराला जमीन देण्यात आली आहे. जानेवारीपर्यंत येथे लॉन्ड्री तयार होऊन आठ तासाच्या दोन पाळीत काम सुरू होईल, अशी अपेक्षा ‘डीआरएम’गुप्ता यांनी व्यक्त केली. लॉन्ड्री सुरू झाल्यानंतर रेल्वेगाड्यात देण्यात येणाºया बेडरोलमधील अस्वच्छ चादर, उशीची खोळ, ब्लँकेटची समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.